अखेर आमसभेचा मुहूर्त निघाला
By admin | Published: January 4, 2016 04:07 AM2016-01-04T04:07:09+5:302016-01-04T04:07:09+5:30
वर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने
कपिल केकत ल्ल गोंदिया
वर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’या मथळ्याखाली २९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असता येत्या १२ तारखेला नगर परिषदेची आमसभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आमसभेसाठी चांगली लांबलचक विषयसूची तयार करण्यात आली आहे.
नगर परिषदेतील कोणत्याही विकास व अंतर्गत कामकाजासाठी आमसभेची मंजूरी घेणे आवश्यक आहे. याकरिता दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. सभेत विविध मुद्दे मांडून सभेची मंजूरी मिळाल्यावरच ती कामे केली जातात. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे. मात्र अध्यक्षांकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याने वर्षभरात सहा आमसभा होण्याऐवजी फक्त एकच आमसभा झाली. तर दर महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा घेणे बंधनकारक असताना स्थायी समितीचीही फक्त एकच सभा घेण्यात आली आहे.
स्थायी समिती व आमसभा होत नसल्याने नगर परिषदेतील विकासकामे व नगर परिषद प्रशासनातील विविध कामे रखडून पडत होती. ११ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत ६० च्या जवळपास विषय मांडण्यात आले होते. यावरून आमसभा घेणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने उचलून धरला व २९ डिसेंबर रोजी ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’ या बातमीतून सर्व परिस्थिती माडली. या बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ. विजय सुयर्वंशी यांनी घेतली असता स्थायी समिती व आमसभेचा मुहूर्त निघाला. येत्या ११ तारखेला स्थायी समिती व १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी वेळीच दखल घेतल्याने नगराध्यक्षांनी ही आमसभा बोलाविली, अन्यथा सभा कधी झाली असती सांगणे कठीण आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पत्र
४‘लोकमत’ची बातमी बघून जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना २९ तारखेलाच पत्र पाठवून ३० तारखेला दुपारी २ वाजता विषयसूची तयार करण्यासाठी कार्यालयात बोलाविले होते. मात्र नगराध्यक्षांनी लगेच विषयसूची तयार केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले व ११ तारखेला स्थायी समिती आणि १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आल्याची माहिती आहे.
विषयसूचीत ३० हून अधिक विषय
४आमसभेसाठी तयार करण्यात आलेल्या विषयसूचीत ३० हून अधिक विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांनी ठरावीक कालावधीत सभा घेण्यास कसूर केल्यास मुख्याधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना कळवितात. त्यावर जिल्हाधिकारी त्यांना प्राप्त अधिकारातून सभा बोलावू शकतात व येथेही तेच होणार होते. मात्र नगराध्यक्षांनी ऐनवेळी विषयसूची तयार करून घेतली.