ब्रेकनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:40 PM2019-05-17T21:40:54+5:302019-05-17T21:41:17+5:30
रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने ब्रेकनंतर शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोहीम राबविली.यांतर्गत तीन अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करीत रस्त्यावर ठेवण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा पुन्हा मोहिमेसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने ब्रेकनंतर शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोहीम राबविली.यांतर्गत तीन अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करीत रस्त्यावर ठेवण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा पुन्हा मोहिमेसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.
वाहतूक नियंत्रण शाखेने १० मे रोजी अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठेवलेले सामान मोठ्या प्रमाणात जप्त केले होते.त्यानंतर दोन-तीन दिवस मोहीम राबवून वाहतूक नियंत्रण शाखेने मोहिमेला खंड दिला होता. परिणामी, गुरूवारी (दि.१६) स्टेडियम समोरील फुटपाथ व नगर परिषद समोरील रस्त्यावर पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ दिसून आली होती. मोहीम बंद पडल्याचे समजून व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान रस्त्यावर ठेवल्याचे दिसले होते. याबाबत, ‘लोकमत’ने शुक्रवारी (दि.१७) बातमीच्या माध्यमातून मोहिमेला खंड पडताच अतिक्रमण होते त्याच स्थितीत आल्याचे दाखवून दिले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी पुन्हा मोहीम राबवून अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका दिला. गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक व चना लाईन परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी तीन अतिक्रमणकर्त्यांवर कलम १०२ अंतर्गत कारवाई करीत रस्त्यावर ठेवलेले सामानही जप्त केले.