परतीच्या पावसामुळे घात

By admin | Published: October 9, 2016 12:43 AM2016-10-09T00:43:20+5:302016-10-09T00:43:20+5:30

‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना ..

After the return rain the ambush | परतीच्या पावसामुळे घात

परतीच्या पावसामुळे घात

Next

धानाचे नुकसान : शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जाणार
गोंदिया : ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना पावसाने पिच्छा सोडलेला नाही. आता हलका धान ऐन कापणीवर असताना काही भागात पावसाने थैमान घातल्यामुळे हाती येत असलेला धान वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्या जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सौंदड शिवारातील
शेतकरी चिंतेत
सौंदड : सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाबरोबर वादळी वारे असल्याने हलक्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. एक हजार दहा, पाटरु, आर.पी.एन., एक हजार एक या जातीच्या धानाचे आणि फुलोऱ्यावर पडलेल्या जोराच्या पावसाने फुलोरा झाडून टाकला. तसेच आलेले धान जमिनीवर लोळत पडल्याने धान फोल होण्यासोबत त्याला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली नाही.
पावसाने आठवडाभर उसंत दिल्यास हलक्या जातीच्या धानाच्या कापणीला सुरुवात होईल. मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेल्या धानपिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे धान मळणीनंतर फेडरेशनच्या मार्फत शासनाने व्यापाऱ्यांच्या घशामध्ये न घालता लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. (लोकमत चमू)

इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होणार?
गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेले इडियाडोह धरण गेल्या दोन ३ वर्षांपासून ओव्हरफ्लो झाले नाही. गेल्यावर्षी तर हे धरण ४० टक्केही भरले नव्हते. त्यामुळे रबी हंगामात पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला होता. यावर्षीसुद्धा सप्टेंबर अखेरपर्यंत हे धरण भरण्याची शाश्वती नव्हती. मात्र आॅक्टोबर महिन्यातही अधूनमधून पाऊस सुरूच असल्यामुळे हे धरण ९७ टक्के भरले आहे. शनिवारच्या सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिला तर हे धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हलक्या धानाचे नुकसान
पांढरी : यावर्षी सर्वच शेतामधील हलके धान्य बहरलेले आहे. आठ ते दहा दिवसामध्ये धान कापणीवर येणार आहे. त्यापूर्वीच पावसाच्या फटकामुळे धान जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना धानाचा फटका बसताना दिसत आहे. पूर्वीपासूनच शेतकरी कर्जाचा बोझे घेवून कसेबसे शेतकरुन आपली उपजिविका करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नैसर्गिक बाबीमुळे मात घालताना दिसत आहे. शासनाने झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करुन भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: After the return rain the ambush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.