१५ तास प्रतीक्षा करूनही कामगार रिकाम्या हाताने परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:21+5:30

गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील काही कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले होते.

After waiting for 2 hours, the workers returned empty handed | १५ तास प्रतीक्षा करूनही कामगार रिकाम्या हाताने परतले

१५ तास प्रतीक्षा करूनही कामगार रिकाम्या हाताने परतले

googlenewsNext
ठळक मुद्देदहा महिला कामगार बेशुद्ध : सुरक्षा संचामुळे कामगार झाले असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालयातर्फे दोन एजन्सींना काम देऊन कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे काम देण्यात आले. परंतु नियोजनशून्य कारभारामुळे गोंदियात मागील पाच दिवसांपासून कामगारांचा गोंधळ उडाला आहे. मंगळवारी पाचव्या दिवशी सकाळी पाच वाजतापासून दाखल झालेल्या हजारो महिलांना रात्री ८ वाजतापर्यंत या सुरक्षा संचाची वाट पाहावी लागली. या सुरक्षा संचाच्या नादात उपाशी तापाशी असलेल्या दहा महिला बेशुध्द झाल्या होत्या.
गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील काही कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले होते. परंतु हे संच वाटप करतांना सहाय्यक आयुक्त उज्वल लोया यांनी खबरदारी न घेतल्यामुळे महिला कामगारांची खूप गैरसोय झाली.
मागील पाच दिवसांपासून गोंदियात हे सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण १४ हजार ७५ कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले. १७ हजार ५३९ कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले नाही. त्यासाठी मागील पाच दिवसांपासून गर्दी होत आहे. गोंदियाच्या प्रितम लॉन येथे हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. हे साहित्य वाटप करण्याचे काम मुंबईच्या दोन कंपन्यांना देण्यात आले. परंतु त्या कंपन्यांचे काम करणारे कर्मचारी कामगारांना धमकावित असल्याने दिवसभरात अनेकदा गोंधळ उडाला.
कामगारांचे दिवसभर झालेले हाल पाहून महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव अमर वºहाडे, विनोद जैन, जहीर अहमद, रामेश्वर लिल्हारे, निलम हलमारे, परवेज बेग, आदिल पठाण, असर राहूल, अनिलकुमार गौतम, जितेंद्र कटरे, दिलीप गौतम असे अनेक राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. एकाच सोबत १० हजारापेक्षा अधिक कामगार एकत्र आल्याने गोंधळ उडाला.
ज्या ठिकाणी हे वाटप करण्याचे शिबिर लावण्यात आले त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेले कामगार बेशुध्द झाले. रात्रीचे आठ वाजूनही हजारो कामगारांची गर्दी हॉल व लॉन परिसरात होती.

साहित्य शासनाचे प्रचार लोकप्रतिनिधींचा
महाराष्ट्र शासनाने कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे निर्णय घेतला. महाराष्ट्र शासन कामगारांच्या हितासाठी काम करीत असतांना त्या पेट्यांवर एका लोकप्रतिनिधीच्या प्रचाराचे फोटो लावले होते. कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अत्यावश्यक सुरक्षा संच पेटीवर फोटो कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासनाकडून कामगारांना शासनाच्या तिजोरीतून साहित्य वाटप करतांना त्या अत्यावश्यक सुरक्षा लोकप्रतिनिधीचे फोटा का लावण्यात आले. या प्रकरणात सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया यांची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार आहे.
- अमर वºहाडे, महासचिव महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटी

Web Title: After waiting for 2 hours, the workers returned empty handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.