पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:41 PM2018-07-08T23:41:21+5:302018-07-08T23:41:55+5:30

जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.

After the wife, the husband also got life | पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

Next
ठळक मुद्देमुलगा झाला अनाथ : एका दिवसाच्या फरकाने सारख्या वेळेवर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.
एकमेकांच्या सुख:दु:खात सहभागी होवून, काबाड-कष्ट करुन मुलाबाळांच्या सुखमय जीवनासाठी जन्मदात्यांची अविरत धडपड असते. घरचा कमवता गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे खाटेवर पडला होता. कमावती पत्नी व एका अविवाहित मुलाने घर सांभाळला. अशातच एकाएकी पत्नी अंतकला गुरुवारी दुपारी ३.२० वाजता मृत्युमुखी पडली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.६) दुपारी नातलगांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व मंडळी घरी आली. दरम्यान इकडे अंथरुणावर पडलेला पती मयाराम यांची ४.२० वाजताच प्राणज्योत मालविल्याची घटना घडली. सर्व आप्तस्वकीय आलेलेच असल्याने मयारामच्या पार्थिवावर पत्नीच्या समाधीजवळच अंत्यसंस्कार उरकवण्याची दुर्दैवी पाळी येथील बारगसाडे कुटुंबावर आली. या पती-पत्नीच्या सलग मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बोंडगावदेवी येथे मयाराम मंगरु बारसागडे (६२), पत्नी अंतकला बारसागडे (५५) व एक अविवाहित मुलगा गजानन (२५) हे तिघेही राहत होते. दोघाही पती-पत्नीने स्वत:च्या अंगमेहनतीने काबाडकष्ट करुन दोन मुलींचा विवाह केला.
पती-पत्नीच्या परस्परांवर असलेल्या प्रेमाने ते दोघेही गोडीगुलाबीने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. अशा या सुखी संसारावर काळाने घाला घातला. एकाच दिवशी पती-पत्नीवर अंतिम संस्कार होणे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. आयुष्यात दोघांनीही कष्ट केले. दोघेही एकमेकांच्या सोबतीला राहत होते. अशी ही प्रेमळ जोडी एकाच दिवशी निघून गेली.
मयाराम यांची मागील काही महिन्यांपासून प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते. पत्नी अंतकला ही मात्र शरीर स्वास्थ्याने बरी होती. खाटेवर पडलेल्या पतीची सेवा करण्यातच तिने धन्यता मानली होती. खाटेवर पडलेल्या मयारामला पत्नी अंतकला मोठी आधार होती. ही जोडी तुटेल अशी पुसटशी कल्पनाही घरच्यांसह शेजाºयांनासुद्धा नव्हती. परंतु म्हणतात ना जन्म-मृत्यू आपल्या हातचा नाही आणि तेच घडले. ध्यानीमनी नसताना एकाएकी गुरुवारी दुपारी पत्नीने पतीचा साथ सोडून मृत्यूला कवटाळले.
पत्नीच्या मृत्यूची हालचाल पतीला लागली. तो पत्नी दु:खवियोगात पडला. पत्नीवर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. स्मशान भूमितून सर्व लोक घरी आले व मयारामने त्याच दिवशी नेमकी तिच वेळ ४.२० साधून मृत्यूला कवटाळले. दोघाही पती-पत्नीचे अंतिम संस्कार शेजारीच करण्यात आले. पती-पत्नीच्या एक दिवसाच्या फरकाने नेमक्या सारख्या वेळेस मृत्यू झाल्याची घटना गावात प्रथमच घडल्याचे सांगीतले जाते. मात्र सज्ञान असलेला मुलगा गजानन अनाथ झाला.

Web Title: After the wife, the husband also got life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू