जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मोरवाहीवासीयांनी आंदोलन घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 05:00 AM2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:07+5:30

मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलन दरम्यान दोषींवर दान दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्हा प्रशासनाने २ महिने उलटूनही दोषी व्यक्तींची कोणतीही चौकशी केली नाही. 

After the written assurance of the District Collector, the people of Morwahi withdrew their agitation | जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मोरवाहीवासीयांनी आंदोलन घेतले मागे

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मोरवाहीवासीयांनी आंदोलन घेतले मागे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहार बांधकामप्रकरणी मागील ४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोरवाहीवासीयांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची  दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींवर कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर सोमवारी (दि.१) रात्री उशिरा आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा समितीतर्फे करण्यात आली. समितीने आंदोलन मागे  घेतल्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे.
मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलन दरम्यान दोषींवर दान दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्हा प्रशासनाने २ महिने उलटूनही दोषी व्यक्तींची कोणतीही चौकशी केली नाही. 
अखेर मोरवाही येथील बौद्ध समाजबांधव तसेच आमगाव येथील बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर गुरुवारपासून (दि.२८) अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला बळ म्हणून येथील महिलांनी सोमवारी (दि.१) ) आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी महिलांच्या हातून ज्वलनशील पदार्थ हिसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे काहीकाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. 
 तसेच लेखी आश्वासनानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनासाठी डी. एस. मेश्राम, संदीप मेश्राम, श्रेयस गोंडाने, मंगल गोंडाने, आनंद बन्सोड, उमाकांत भालेकर, पंचशीला मेश्राम, संगीता रामटेके, प्रमिला मेश्राम, शालिनी मेश्राम, सूर्यकांता वैद्य, सविता मेश्राम, सुनीता वैद्य, माधुरी मेश्राम, पंचशीला भालाधरे,   पोर्णिमा मेश्राम, तारा भीमटे, प्रतिमा सोनटक्के, कल्पना मेश्राम, पद्मा टेंभुर्णीकर, शालिनी आनंद मेश्राम आदीनी सहकार्य केले.

आठ दिवसात करणार कारवाई 
- चर्चेत जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, पोलीस निरीक्षक बोरसे, आंदोलकांतर्फे भारतीय बौद्ध महासभा आमगावचे अध्यक्ष भरत वाघमारे, सचिव योगेश रामटेके, समता बुद्ध विहार समितीचे दिलीप मेश्राम, विजय मेश्राम, आशिष मेश्राम, अनिल रामटेके, चंद्रशेखर मेश्राम, राजकपूर मेश्राम, पूर्व सरपंच सुरेश कावळे, पोलीस पाटील विनोद ठाकूर सहभागी झाले होते. यात आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करीत या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर आठ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

Web Title: After the written assurance of the District Collector, the people of Morwahi withdrew their agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.