आगळा वेगळा विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:50 PM2018-03-19T21:50:31+5:302018-03-19T21:50:31+5:30
शहरात गुढीपाडवा, मराठी नविन वर्षाच्या पर्वावर, रविवारी (दि.१९) एक अनोखा व आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.
डी.आर.गिरीपुंजे ।
आॅनलाईन लोकमत
तिरोडा : शहरात गुढीपाडवा, मराठी नविन वर्षाच्या पर्वावर, रविवारी (दि.१९) एक अनोखा व आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याने सर्व समाजबांधवापुढे आदर्श ठेवला असून लग्न सोहळ्यावर केल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे तिरोडा शहरात सध्या एक विवाह ऐसा भी याची चर्चा आहे.
प्रो. हितेशकुमार पटले व वधू इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथील वरीष्ठ सहायक योगीता पारधी यांनी मात्र आपल्या आई-वडीलांना व नातेवाईकांना विश्वासात घेत एक आगळा-वेगळा विवाह लावून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला. हे लग्नकार्य केवळ एकाच दिवसात संपले त्यामुळे वेळ व पैशाची बचत झाली.
लग्नात वधू माता-पित्यांना खूप खर्च करावा लागतो. परंतु इथे वधुला वराच्या मंडपात आणून कुठलाही खर्चात न लागू देता विवाह पार पडला. लग्नाला डी.जे., बॅन्ड, घोडा केला नाही, ध्वनीप्रदूषण टाळले तर सकाळी लग्न ठेवून विजेची रोषणाई टाळली. लग्नाची सुरुवात राष्ट्रगीत जनगण मन ने केली नंतर मंगलाष्टके म्हणून लग्न पार पाडले. लग्न लागताच अक्षता (तांदूळ-ज्वारी) चा वर्षाव केला जातो.
मंगलाष्टके पूर्ण होताच टाळ्यांच्या गडगडाटात लग्न सोहळा पार पडला ना अक्षता, ना फुले, ना फटाके इथे शांततामय वातावरणात विवाह पार पडला. सुलग्न सुरु झाले. त्यातून मिळणाºया पैशाचा उपयोग अनाथाश्रमाला देण्याचा निर्णय वधू-वरांनी घेतला. लग्न अगदी वेळेवर १२ वाजता लावून वेळेचे महत्व पटवून दिले.
लग्नानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
लग्नानंतर लगेच प्रबोधनपर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यात संजय नाथे यांनी लग्नाचे प्रकार सांगून सोईस्कर कमी वेळात, कमी खर्चात लग्न कसे करता येईल हे स्वत:च्या लग्नाचे उदाहरण देवून सांगितले. त्यानंतर युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगितले. सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले यांनी अनावश्यक खर्चाची व वेळेची कशी बचत केली हे सांगितले.