एजंट अन् सीईओने ठेवीदारांचे ११.१५ लाख खिशात घातले! २०१२ ते १४ या वर्षातील घोळ
By नरेश रहिले | Published: November 28, 2023 05:08 PM2023-11-28T17:08:47+5:302023-11-28T17:10:08+5:30
सालेकसा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
नरेश रहिले, गोंदिया: सालेकसा येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेतील ठेवीदारांचे ११ लाख १४ हजार ८९५ रूपयाचा अपहार करणाऱ्या एजेंट व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांवर सालेकसा पोलिसात २७ नोव्हेंबर रोजी अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षातील घोळ असल्याचे लेखापरिक्षण अहवालात म्हटले आहे. उपलेखापरिक्षक विजय केवलराम मोटघरे (४४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सालेकसा येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था येथे नागरिकांच्या ठेवी होत्या. त्या संस्थेचा एजेंट जयकुमार लक्ष्मीप्रसाद श्रीवास्तव (५०) खोलगड ता. सालेकसा व पतसंस्थेतचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश रामप्रसाद खोब्रागडे (५४) रा. सालेकसा यांनी सन २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधीत ११ लाख १४ हजार ८९५ रुपयाचा अपहार केला.
एजेंट संजयकुमार लक्ष्मीप्रसाद श्रीवास्तव यांना ६ मे २००६ पासून या संस्थेत अभिकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आली होती. तेव्हापासून संजय श्रीवास्तव हा संस्थेचा अभिकर्ता म्हणून कार्यरत होता. त्याने संस्थेचे ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम संस्थेमध्ये कमी भरणा केली. तब्बल ७ लाख ८८ हजार ३२५ रूपयाची अफरातर केली. त्यानंतर संजय श्रीवास्तव याने संस्थेच्या पासबुकचा गैरवापर करून स्वतंकडे ठेवुन तसेच बनावट पासबुक तयार करुन ठेवीदारकडुन जमा केलेली रक्कम २ लाख २६ हजार ५७० रूॅपये असे एकुण १० लाख १४ हजार ८९५ रूपयाचा श्रीवास्तव याने अपहार केला आहे. संस्थेचे सचिव जगदिश रामप्रसाद खोब्रागडे यांनी १ लाख रूपयाचे खर्च व्हाउचर तयार केले. ते व्हाउचर विद्युत केंद्राचे प्रमाणपत्र, पावती संस्थेला सादर केली नाही. त्यांनी एक लाखाचा अपहार केला आहे. असे दोन्ही आरोपींनी संस्थेचे एकुण ११ लाख १४ हजार ८९५ रूपयाचा अपहार केल्याचे सविस्तर चाचणी लेखापरिक्षण अहवालात स्पष्ट झाले. आरोपींवर सालेकसा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.