वृद्धापकाळ पेन्शनसाठी आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:46 AM2018-06-17T00:46:33+5:302018-06-17T00:46:40+5:30
तालुक्यातील बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले (७०) यांनी श्रावण बाळ योजनेतंर्गत वृद्धापकाळ पेन्शन पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शुक्रवार (दि.१५) पासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले (७०) यांनी श्रावण बाळ योजनेतंर्गत वृद्धापकाळ पेन्शन पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शुक्रवार (दि.१५) पासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
मागील दोन वर्षापूर्वी पटले यांची वृद्धापकाळ पेन्शन योजनेतंर्गत पेशंन सुरु करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना निराधार योजनेस अपात्र ठरवून पेन्शन बंद करण्यात आली. त्यामुळे त्यांनी आपली पेन्शन पूर्ववत सुरु करण्यात यावी म्हणून आमरण उपषोण सुरु केले. जर मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या २१ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा प्रेमचंद पटले यांनी दिला आहे. पटले यांची पेन्शन का बंद करण्यात आली. याबद्दल संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.