पटेल व अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:00 AM2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:20+5:30

ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनानी महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा. मराठा समाजास द्यावयाच्या आरक्षणास ओबीसी समाजाचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजास मिळत असलेल्या १९ टक्के आरक्षणातून देण्यात येवू नये, ओबीसी समाजाच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, ठाणे,नाशिक,पालघर या जिल्ह्यातील आरक्षण १९ टक्के करण्यात यावे.

Agitation in front of Patel and Agarwal's office | पटेल व अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

पटेल व अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

Next
ठळक मुद्देओबीस संघर्ष कृती समिती : जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया : ओबीसी संघटनांच्यावतीने गुरूवारी (दि.८) राज्यव्यापी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत गोंदिया येथे ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने खा. प्रफुल पटेल व आ. विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर थाळीनाद करुन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यानंतर, उपमुख्यमंत्री, बहुजन मंत्री आदींच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिले.ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनानी महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा. मराठा समाजास द्यावयाच्या आरक्षणास ओबीसी समाजाचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजास मिळत असलेल्या १९ टक्के आरक्षणातून देण्यात येवू नये, ओबीसी समाजाच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, ठाणे,नाशिक,पालघर या जिल्ह्यातील आरक्षण १९ टक्के करण्यात यावे. १०० टक्के बिंदू नामावली केंद्र सरकारच्या २.७.९७ व ३१.१.२००९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्वरीत सुधारित करण्यात यावी. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे. महाज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रूपयांची तरतूद करून लवकर सुरू करण्यात यावे.
ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरीत सुरू करण्यात याव्यात.ओबीसी समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष त्वरीत भरण्यात यावा.ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे.ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरू करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनात ओबीस संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, उपाध्यक्ष गणेश बरडे, महासचिव शिशिर कटरे,कोषाध्यक्ष कैलास भेलावे, विनोद हरिणखेडे,ओबीसी सेवा संघाचे पी.डी.चव्हाण, विद्यार्थी सचिव गौरव बिसेन,ओबीसी कर्मचारी महासंघाचे सचिव रवी अंबुले,एस.यु. वंजारी, ओबीसी संघर्ष समिती तालुकाध्यक्ष डॉ. प्रदिप रोकडे, सचिव सुनील पटले, समन्वयक राजीव टकरेले, भारतीय पिछडा समाज संघटनेचे अध्यक्ष प्रेम साठवणे,बहुजन युवा मंच अध्यक्ष सुनील भोंगाडे, गणेश चुटे,महेंद्र बिसेन, प्रेमलाल गायधने, प्रमोद बघेले, दयाशंकर वाढई, सुरेंद्र गौतम, पप्पू पटले, मधुकर टाकरे, डी.आय.खोब्रागडे, जितेश टेंभरे, हरिष मोटघरे,रवी सपाटे, हेमंत पटले,भुषण राखडे यांच्यासह ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Agitation in front of Patel and Agarwal's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.