विधानसभा निवडणुकीत अग्रवाल यांची भूमिका महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:02 AM2019-02-10T01:02:18+5:302019-02-10T01:02:41+5:30
मध्य प्रदेशाचे नेहमीच गोंदियाशी पारिवारिक आणि राजकीय संबंध राहीले आहे. मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील राजकारण बऱ्याच प्रमाणात प्रभावित करीत असते. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बालाघाट जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून गोपालदास अग्रवाल यांची भूमिका प्रभावशाली राहिली असे गौरवद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मध्य प्रदेशाचे नेहमीच गोंदियाशी पारिवारिक आणि राजकीय संबंध राहीले आहे. मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील राजकारण बऱ्याच प्रमाणात प्रभावित करीत असते. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बालाघाट जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून गोपालदास अग्रवाल यांची भूमिका प्रभावशाली राहिली असे गौरवद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काढले.
गोंदिया येथे मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमानिमित्त शनिवारी (दि.९) ते गोंदिया येथे आले होते. या वेळी त्यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते.
या वेळी त्यांनी आ. अग्रवाल यांच्यासोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. कमलनाथ म्हणाले, अग्रवाल यांनी मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्ष संघटन बळकटीकरण आणि निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. शिवाय आपले त्यांच्याशी मागील २५ ते ३० वर्षांपासून पारिवारीक संबंध आहेत. गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकट करण्याचे काम आ. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात होणार असल्याचे सांगितले. या वेळी आ. अग्रवाल यांनी वैनगंगा नदीवर डांर्गोली सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली.या प्रकल्पासाठी महाराष्टÑ सरकार सुध्दा अनुकुल असून देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी कमलनाथ यांच्या हस्ते अग्रवाल यांच्या निवासस्थानी विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. या वेळी मध्यप्रदेशचे खनिकर्म मंत्री प्रदीप (गुड्डा) जयस्वाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, महासचिव अपूर्व अग्रवाल, माजी खा.विश्वेवर भगत, अनुपसिंह बैस, आमदार मधू भगत, जुगल शर्मा, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, आलोक मोहंती, हरिश तुळसकर, पन्नालाल सहारे उपस्थित होते.