हिवरा येथे लवकरच सुरू होणार कृषी महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:17 AM2017-12-15T01:17:40+5:302017-12-15T01:18:05+5:30

आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि युवकांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता हिवरा येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Agricultural College will be started soon in Hira | हिवरा येथे लवकरच सुरू होणार कृषी महाविद्यालय

हिवरा येथे लवकरच सुरू होणार कृषी महाविद्यालय

googlenewsNext
ठळक मुद्देपंधरा दिवसात प्रस्ताव पाठवा : अग्रवाल यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि युवकांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता हिवरा येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालय स्थापन करण्याकरिता १५ दिवसात अहवाल तयार करुन शासनाला पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाला आ.गोपालदास अग्रवाल यांनी दिले.
जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून हिवरा कृषी विज्ञान केंद्र येथे मानव विकास योजनेतंर्गत दोन स्वंयचलित माती परीक्षण प्रयोगशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या वेळीे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले उपस्थित होते. या प्रयोगशाळेतून दरवर्षी दोन हजार माती नमुण्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मातीमध्ये कमी असलेल्या पोषक घटकांची माहिती मिळून जमिनीची पोत सुधारण्यास मदत होणार आहे. गोंदिया जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. शेतकºयांवर दरवर्षी ओढावणारे नैसर्गिक संकट आणि वाढत्या लागवड खर्चामुळे शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी तोटा सहन करावा लागत असल्याने ते कर्जाच्या डोंगराखाली येत आहेत. त्यामुळे पांरपारिक शेतीला फाटा देत शेतीत नवीन प्रयोग राबविण्याची गरज आहे. त्यासाठी हिवरा येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना येईल. यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगारमुख शिक्षणाची सुविधा मिळेल. कुलगुरू डॉ. भाले व कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राने कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पंधरा दिवसात तयार शासनाला पाठविण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले. आपण स्वत:चा याचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Agricultural College will be started soon in Hira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.