कृषी उपयोगी ट्रॅक्टर धावताहेत रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:18 PM2019-05-26T23:18:02+5:302019-05-26T23:19:21+5:30

नवीन ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करामधून सूट मिळते. मात्र बरेच व्यावसायीक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली.

The agricultural utility tractor is running on the road | कृषी उपयोगी ट्रॅक्टर धावताहेत रस्त्यावर

कृषी उपयोगी ट्रॅक्टर धावताहेत रस्त्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देनियमांचे सर्रास उल्लंघन : कृषीकरिता उचल करून व्यावसायिक वापर, शासनालाही आर्थिक फटका

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवीन ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करामधून सूट मिळते. मात्र बरेच व्यावसायीक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली. सद्यस्थितीत जिल्ह्यात कृषीच्या नावावर उचल केलेले तीन हजारांवर ट्रॅक्टर व्यावसायीक कामासाठी वापरले जात असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
शासन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयांना सवलत दिली जात आहे. याचा शेतकºयांना लाभ होत आहे. मात्र इतर कृषी योजनांप्रमाणे याही योजनांचा लाभ शेतकºयांच्या नावावर इतर लोक घेत आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ हजार ९४० ट्रॅक्टर असून यापैकी पाच हजार ट्रॅक्टरची व्यावसायीक कामासाठी उचल करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन हजार ९४० ट्रॅक्टरची कृषी कामासाठी उचल केल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली.
नियमानुसार कृषी कामासाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग हा कृषीसाठी करणे गरजेचे आहे. या ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतूद आहे. शिवाय सदर ट्रॅक्टरची नोंदणी सुद्धा रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र बºयाच लोकांकडून शेतीचा सातबारा जोडून ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व्यावसायीक कामासाठी उपयोग होत आहे. यात कंत्राटदार, बिल्डर आणि रेतीमाफियांचा सर्वाधिक समावेश आहे.
याप्रकारामुळे शासनाला कर स्वरुपात प्राप्त होणारा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हा प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही.

कृषीच्या नावावर उचल केलेल्या ट्रॅक्टरचा शेती कामासाठीच वापर करणे आवश्यक आहे. त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर होत असल्यास दंडाची आकारणी व नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात लवकरच या विरुद्ध मोहीम राबवून कृषी उपयोगी ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग करणाºयांवर कारवाई केली जाईल.
-विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया.

असा उघडकीस आला प्रकार
कृषीच्या नावावर उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग केला जात असल्याची बाब महसूल विभागाने रेतीची अवैध वाहतूक करताना पकडलेल्या ट्रॅक्टरवरुन उघडकीस आली. पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात सदर ट्रॅक्टरची नोंदणी ही कृषी कामासाठी केली असून त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर केला जात असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे नियमानुसार या ट्रॅक्टरवर १० पट दंड आकारण्यात आला.
कारवाई होत नसल्याने मोकळे रान
रस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल ही नेमकी कशासाठी केली आहे, ही बाब ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय कळत नाही. नेमका याच गोष्टीचा फायदा काही लोक घेत असून कृषीसाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग करीत आहे. शिवाय त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांना रान मोकळे असल्याचे चित्र आहे.

Web Title: The agricultural utility tractor is running on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती