कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 09:07 PM2018-08-16T21:07:02+5:302018-08-16T21:07:31+5:30

जोपर्यंत शेतकरी पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही. नेमका हाच धागा पकडून तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Agriculture Department Farmers Build | कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : जोपर्यंत शेतकरी पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही. नेमका हाच धागा पकडून तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता, कमी पर्जन्याचा शेतीवर अनुकुल परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न कृषी विभागातर्फे केला जात आहे. यात तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.
तालुक्यात पट्टा व श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. तालुक्यातील रेखा टेंभरे, दारकन बिसेन, ममता हटवार या महिला शेतकऱ्यांच्या बांधावर श्रमदान व रोवण्या करण्यात आल्या. जलयुक्त शिवार अभियान, उन्नत शेती समृद्ध शेतकरी यासारख्या अभियानाला जोड देत हायटेक शेती कशी करावी, याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन करीत आहे.
लोकसहभागातून झाली कामे
तिरोडा तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियान सन २०१६-१७ मध्ये ग्रामपंचायत यंत्रने मार्फत मामा तलाव गाळ काढणे, नाल्यातील गाळाचा उपसा केल्याने पाणी साठ्यात वाढ करणे शक्य झाले. यामुळे भूजल पातळीत सु्द्धा वाढ झाली. निघालेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या शेतात नेवून टाकला. त्यामुळे शेतीची सुपिकता वाढविण्यास मदत झाली.

शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठविण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिन विकास शक्य आहे.
-मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी, तिरोडा

Web Title: Agriculture Department Farmers Build

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.