कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे कृषी मित्रांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 09:55 PM2017-12-30T21:55:13+5:302017-12-30T21:55:23+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील कृषी मित्रांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील कृषी मित्रांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम सभेत घेण्यात आलेल्या विषयांचा आढावा घेण्यात आला. पश्चात, शासनाच्या ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, मागेल त्याला शेततळे, बोडी, कृषी यांत्रिकीकरण योजनांविषयी कृषी मित्रांना मार्गदर्शन करण्यात आले. दिलेल्या योजनांची माहिती त्यांचा कार्यक्षेत्रातील शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील पिकांबाबत सुद्धा यावेळी त्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची सर्वसाधारण माहिती गोळा करण्याकरिता त्यांना मुद्देसुद फॉर्मेट देण्यात आले. तसेच योजनांचा लाभ घेण्याकरिता आॅनलाईन अर्ज व त्याकरिता लागणाºया आवश्यक कागदपत्रांविषयी यावेळी विस्तृत माहिती देण्यात आली. सोबतच त्यांना तालुक्यात भाजीपाला व फळबागेखालील क्षेत्र वाढीकरिता शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सुचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असेही यावेळी सांगण्यात आले.
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी यांनी शेतकºयांना शेंद्रीय शेती, तालुक्यात सद्यस्थितीतील आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सभेला मंडळ कृषी अधिकारी एस.व्ही. भोसले, कृषी मीत्र मोतीराम भेंडारकर, अतुल पटले, विजय लांज़ेवार, प्रमिला बहेकार, सीमा हरिणखेडे, शारदा कोरे, इंदू मेंढे, जैपाल राणे, भैयालाल बोरघडे, आनंदराव खोटेले, ओमप्रकाश दसरिया, तिलकसिंह मच्छिरके, श्रीकिसन हुकरे, उपस्थित होते.