अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:45 PM2019-06-01T23:45:47+5:302019-06-01T23:46:10+5:30
पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहत शुक्रवारी (दि.३१) अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तंबाखू पदार्थ विषयक व्यसनाधिनता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहत शुक्रवारी (दि.३१) अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तंबाखू पदार्थ विषयक व्यसनाधिनता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला कॅन्सर केअर रिलायंस हॉस्पीटल मधील कर्करोग किरणोत्सार तज्ञ डॉ. चैतन्य एम, एरीया मॅनेजर राकेश हत्तीमारे, निकीत सक्सेना, मुकेश बावरीया, तिर्थेश गंधे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक विनिता साहू यांचा हस्ते डॉ. चैतन्य एम. यांना झाडाचे रोपटे देवून त्यांच्या टिमसह जिल्हा पोलीस दलच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सदर शिबिरात डॉ. चैतन्य एम. यांनी, तंबाखू पदार्थ सेवन केल्यास आपल्या शरीरास कुठकुठले दुष्परिणाम होतात, ते टाळण्यासाठी आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याबाबत माहिती सांगून शरीर निरोगी राहण्याकरीता सखोल मार्गदर्शन केले.
पोलीस अधीक्षक साहू यांनी, एखाद्या व्यक्तीस तंबाखू पदार्थ व्यसनापासून मुख कर्करोग झाल्यास त्याला व त्यांचा कुटूंबीयांना किती नाहक त्रास सहन करावा लागतो याची कल्पना सुध्दा आपण करु शकत नाही. त्यामुळे ती व्यक्ती व त्यांचे कुटंूबीय त्या विचारात सतत गुंतलेले असतात व कुटूंबीयांची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळत जाते असे सांगीतले.
कार्यक्रमाला पोलीस उप अधीक्षक (मुख्या.) सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा महिपालसिंग चांदा तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
संचालन मपोनि पूनम मंजुटे यांनी केले. कार्यक्रमासाठी कल्याण शाखेतील पोलीस निरीक्षक सुधीर घोनमोडे, नापोशि राजु डोंगरे व पोलीस मुख्यालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सेवानिवृत्तांचा सपत्नीक सत्कार
या कार्यक्रमात जिल्हा पोलीस दलातील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले सहायक फौजदार रविशंकर रुषीनाथ कोकाटे व बंसीलाल झिंगरु शेंडे यांचा पोलीस अधीक्षक साहू यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र व ओळखपत्र देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला.