खेड्यांचा विकास करणे शिबिराचा उद्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:40 PM2018-01-18T22:40:12+5:302018-01-18T22:40:23+5:30
तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील भारत हा खेड्यात असून या खेड्यांचा सर्वांगीन विकास करणे हाच शिबिराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भरत बहेकार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील भारत हा खेड्यात असून या खेड्यांचा सर्वांगीन विकास करणे हाच शिबिराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भरत बहेकार यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येथील मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनेच्यावतीने ग्राम नाकानिंबा येथे आयोजीत शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एल.एच. जिवानी हे होते. पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य दुर्गा तिराले, सरपंच गोविंदराव वरखडे व जियालाल पटले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज व स्व. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. याप्रसंगी तिराले यांनी, विद्यार्थ्याच्याअंगी असणाºया कलागुणांचा विकास करुन देशसेवेसाठी समर्पित होण्याची भावना शिबिरातून वृद्धींगत होते असे मत मांडले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य जीवानी यांनी, व्यक्तीमत्व विकास व शिस्त हे विद्यार्थ्यांच्या विकासाचे माध्यम असल्याचे विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.जे. राठोड यांनी मांडले. संचालन प्रा. इंद्रकला बोपचे यांनी केले. आभार प्रा. अश्विन खांडेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. भूषण फुंडे, डॉ. बी.के. जैन, प्रा. सुनीता अंबुले, भागेश्वर आंबेडारे, रासेयोचे सर्व स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी यांनी सहकार्य केले.