दारु दुकान बंदीचा फटका हातगाडी विक्रेत्यांना
By admin | Published: April 4, 2017 01:05 AM2017-04-04T01:05:57+5:302017-04-04T01:05:57+5:30
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १ एप्रिलपासून राज्यमार्गावरील सर्व दारुची दुकाने आणि बार बंद करून सील लावण्यात आले.
अनेकांवर बेरोजगारीचे संकट: गैरप्रकारांना मात्र बसला आळा
सालेकसा : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १ एप्रिलपासून राज्यमार्गावरील सर्व दारुची दुकाने आणि बार बंद करून सील लावण्यात आले. त्यामुळे दारुच्या दुकानांचा परिसर निर्जन वाटत आहे. या दुकानांच्या परिसरातील आमलेट, चिखन व इतर नाष्टाच्या दुकानांवर शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे अनेक दुकानदार बेरोजगार झाले आहेत.
पुरुष दिवसरात्र दारुच्या नशेत राहत होते. दारुसाठी घरची वस्तू सुध्दा विकून टाकत होते. मद्यपी लोकांच्या वागणुकीमुळे घरी महिला त्रस्त होऊन जायची अशा महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. दारुची दुकाने बंद झाल्याने चौकाचौकात दारु दुकानामुळे चालणारे रोजगार लोक बेरोजगार झाले आहे. ज्या गावात किंवा चौकात दारूची दुकाने नियमित चालत होती.
गावागावातील चौकामध्ये व दारु दुकानाच्या परिसरात आमलेट, चिकन, मच्छी, मटन व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत आहे. अंडी विक्री, तळलेले पदार्थ भजे, समोसे, वडे, मासे, मटन, पोल्ट्री फार्म, किराना, मावा, गुटखा, सारखे व्यवसाय चालवतात.
पाकीटबंद आलू चीप, शेंगदाने, दलिया, फुटाने, वटाने असे पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होतात. अप्रत्यक्षरित्या इतर व्यवसायात सुध्दा वाढ झाली असते. दारुची दुकान बंद झालेल्या परिसरात या सर्व व्यवसायावर जबरदस्त फटका बसला आहे. दुकानदारांच्या मतानुसार हा फटका नोटबंदी पेक्षा कीतीतरी पटीने जास्त आहे.
दारुची दुकाने बंद झाल्याने एकीकडे अनेक लोकांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. दारु दुकान असलेला ठिकाण जवळून रस्त्यावरून सभ्य माणसाला चालणे कठीण होत होते. यात महिलांची तर मोठी कोंडी व्हायची.
आता महिला रस्त्यावरून बिनधास्त चालताना दिसत आहेत. दारु दुकान परिसरात अश्लील शिवीगाळ करणारे, भांडण करण्याचे व दारु पिऊन रस्त्यावर पडून राहणारे लोक बेपत्ता झालेले दिसत आहेत. महिला समोर निर्लज्ज वागणूक करणारे, दारु पिऊन घरी भांडण करणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)