अर्जुनीत कारमधून दारूची वाहतूक
By admin | Published: February 12, 2017 12:45 AM2017-02-12T00:45:50+5:302017-02-12T00:45:50+5:30
येथील वार्ड क्रमांक ५ मधील एका घराची झडती घेतली असता देशी दारूचे ३३६ पव्वे तसेच घरासमोर
३.७३ लाखांचा ऐवज जप्त : विशेष पथकाची कारवाई
अर्जुनी-मोरगाव : येथील वार्ड क्रमांक ५ मधील एका घराची झडती घेतली असता देशी दारूचे ३३६ पव्वे तसेच घरासमोर उभ्या असलेल्या मारूती कारमध्ये ठेवलेले देशी दारूचे ३४० पव्वे पोलिसांनी पकडले. ही कारवाई पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने शनिवारी सकाळी केली. याप्रकरणी राजाराम मारोती फुल्लेवार या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वार्ड क्र.५ अर्जुनी-मोरगाव येथे आरोपीचे राहते घर आहे. विशेष पथकाने त्यांच्या घरी धाड घातली. यात आरोपीचे घराच्या माजघरात १८० मिमीने भरलेले ३३६ नग देशी दारू आढळून आली. याची किंमत १५ हजार ४५६ रुपये असल्याचे समजते. घरासमोर मारुती स्विफ्ट क्रं.एमएच३५/पी-२५२९ ही कार उभी होती. या कारची झडती घेतली असता देशी दारूचे ३४० लहान पव्वे आढळून आले. याची किंमत ८ हजार ५०० रुपये एवढी आहे.
विनापरवाना वाहनात देशी दारू आढळून आल्याने पोलिसांनी वाहनासह एकूण ३ लक्ष ७३ हजार ९५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचे फिर्यादीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी राजाराम मारोती फुल्लेवार (३५) अर्जुनी-मोरगाव या आरोपीला अटक करण्यात आली. त्याचेविरुध्द कलम ६५ (ई), ७७ (अ) मदाका अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)