वाढत्या उकाड्याने सर्व हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 09:16 PM2019-05-03T21:16:45+5:302019-05-03T21:17:28+5:30

जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यातच ४३ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हावासीयांत घबराट निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा ४७.५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानातही गेला असून सन १९९८ मधील मे महिन्यात आणि सन २००३ मधील जून महिन्यात एवढी नोंद घेण्यात आली आहे.

All of the grinding holes | वाढत्या उकाड्याने सर्व हैराण

वाढत्या उकाड्याने सर्व हैराण

Next
ठळक मुद्देमे १९९८ मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद : वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यातच ४३ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हावासीयांत घबराट निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा ४७.५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानातही गेला असून सन १९९८ मधील मे महिन्यात आणि सन २००३ मधील जून महिन्यात एवढी नोंद घेण्यात आली आहे. त्यात यंदा एप्रिल महिना ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने येत्या दोन महिन्यांत तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उकाड्यामुळे मात्र सर्वांच्या जीव कासावीस झाला असून कधी या उकाड्यापासून सुटका केव्हा मिळते याची सर्वच वाट बघत आहेत.
निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र वाढते सिमेंटचे जंगल आणि वृक्षांचे कमी होत चाललेले प्रमाण हे तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ऋतूचक्र व निसर्गावर सुध्दा याचा परिणाम होत आहे. पावसाळ््यात पाऊस पडत नसून उन्हाळ््यात रविराज सीमा तोडून आग ओकू लागले आहे. पर्यावरणाशी माणूस जो खेळ खेळत आहे त्याची प्रतीपूर्ती निसर्गाकडून केली जात आहे.उन्हाळ््यात कधी मे महिना तापत असताना आता मात्र मार्च महिन्यापासून सूर्यदेव आग ओकत आहेत.
यंदाचीच स्थिती बघितल्यास एप्रिल महिन्यानेच सर्वांना होरपळून काढले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान ४३.८ अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. यावरून मे महिन्यात पडणारी उन्ह आता त्यापूर्वीच पडू लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, सध्यातरी ४३.८ अंश सेल्सिअस सर्वाधीक तापमान असले तरी मे आणि जून महिना शिल्लक आहे. त्यामुळे मे आणि जून महिन्यात तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील मागील २० वर्षांतील तापमानाचा अभ्यास केल्यास सन १९९८ मध्ये मे महिन्यात जिल्ह्यात ४७.५ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. तर सन २००३ मधील जून महिन्यातही ४७.५ एवढीच नोंद घेण्यात आली आहे. यावरून सध्या तरी तेवढा उन्हाळा पडत नसल्याचे दिसते. मात्र एप्रिल महिन्यातील स्थिती बघता मे आणि जून महिना धोक्याचा दिसून येत आहे.
विदर्भात रेड अलर्ट
विदर्भातील तापमानात सातत्याने होत असलेली वाढ पाहता विदर्भात रेड अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. त्यातही गोंदिया जिल्हाचे तापमान ४७.८ अंश सेल्सिअस पर्यंत गेला असल्याने यंदाही एवढे तापमान गाठण्याची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे विदर्भातील तापमानातील वाढ बघता हवामान खात्याने विदर्भात रेड अलर्ट घोषीत केला आहे. वाढते तापमान बघता हवामान खात्याने दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हात बाहेर पडू नये असे आवाहनही सुरक्षेच्या दृष्टीने केले आहे.

Web Title: All of the grinding holes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान