सर्वपक्षीय शांती मोर्चाचे पोलिसांना साकडे

By admin | Published: April 12, 2016 04:11 AM2016-04-12T04:11:10+5:302016-04-12T04:11:10+5:30

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर शनिवारी सायंकाळी झालेल्या हल्ल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया

The All-Party Peace Morcha Police | सर्वपक्षीय शांती मोर्चाचे पोलिसांना साकडे

सर्वपक्षीय शांती मोर्चाचे पोलिसांना साकडे

Next

गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर शनिवारी सायंकाळी झालेल्या हल्ल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया शहरासह जिल्हाभरात निर्माण झालेले तणावसदृश वातावरण सोमवारी सायंकाळी निवळले. मात्र गोंदियात बाजारपेठ दिवसभर बंद होती. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शांतीमोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर बंद मागे घेत असल्याचे काँग्रेसकडून एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.
पत्रपरिषद सुरू असताना अचानक येऊन हल्ला करणारे नगरसेवक शिव शर्मा व सहकारी राहुल श्रीवास हे ४८ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यांना अटक करा आणि गोंदियावासीयांना दहशतीतून मुक्त करा, अशी मागणी सोमवारी सर्वपक्षीय शांती मोर्चाने पोलीस प्रशासनाकडे केली. एसडिपीओ राठोड यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून यात कोणतीही हलगय सुरू नसल्याचे आ.राजेंद्र जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, भंडारा-गोंदिया लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, जि.प.सभापती पी.जी.कटरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे आदींच्या शिष्टमंडळाला सांगितले.
या मोर्चात राष्ट्रवादीचे जि.प.मधील गटनेता गंगाधर परशुरामकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, काँग्रेसचे जिल्हा महासचिव आणि आदिवासी नेते सहेसराम कोरोटे, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, अमर वराडे, राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, माजी अध्यक्ष दामोधर अग्रवाल, विशाल अग्रवाल, डॉ.झामसिंग बघेले, राजेश नंदागवळी, दीपक नशिने, राकेश ठाकूर, अशोक शहारे, संदीप ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निषेध मोर्चा व सभेचे संचालन जिल्हा काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

अग्रवाल मुंबईला रवाना
४हल्ल्याने झालेल्या दुखापतीमुळे दोन दिवसांपासून गोंदियातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले आ.गोपालदास अग्रवाल सोमवारी पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना झाले. नाकातून बराच वेळ थेंब-थेंब रक्तप्रवाह झाल्यामुळे अंतर्गत दुखापतीची तपासणी तिथे केली जाणार आहे. तिथेच ते प्रकृती सावरल्यानंतर विधानसभा अधिवेशनालाही हजेरी लावणार आहे.

शर्माचा सर्वत्र शोध सुरू
४या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजपातून निलंबित केलेले नगरसेवक शिव शर्मा यांचा गोंदिया, बालाघाटसह इतरही भागात सुरू आहे. मात्र पोलिसांना त्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही. अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या नेतृत्वातील पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान शर्मांना अटक झाली नसली तरी गोंदियातील वातावरण मंगळवापासून पूर्वपदावर येणार आहे.

अनेक दिग्गजांकडून प्रकृतीची विचारणा
४काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार या नात्याने आ.अग्रवाल यांच्या प्रकृतीची प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल, माजी प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी चौकशी करून त्यांना धीर दिला.

आमगावात काँग्रेसचे निवेदन
आमगाव : नगरात रविवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. यादरम्यान गांधी चौकात निषेध सभा घेऊन तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. हल्लेखोर शिव शर्माला अटक करा अशी मागणी त्यात करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी धिरेश पटेल, सुरेंद्र मिश्रा, इसुलाल भालेकर, राजकुमार फुंडे, केशरीचंद सेठीया, रामसिंह चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
सडक-अर्जुनीत पाळला बंद
सडक-अर्जुनी : अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद सोमवारी (दि.११) सडक-अर्जुनी येथे उमटले. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण सडक-अर्जुनी तालुका बंदचे आवाहन केले होते. सोमवारला सकाळपासून सर्व दुकाने बंद दिसून आली. काही तुरळक ठिकाणी दुकाने चालू होती. ती कार्यकर्त्यांनी बंद पाडली. दुकानदारांनी बंदला चांगलाच प्रतिसाद दिला. या बंदसाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष निताराम देशमुख, रामलाल राऊत, शेषराव गिऱ्हेपुंजे, जि.प.सदस्य शारदा कापगते, राजेश नंदागवळी, विलास कापगते, दिनेश कोरे, राजू पटले, अनिल राजगिरे, नगर पंचायत सदस्य रिहान शेख, नगर पंचायत सदस्य अभय राऊत, महम्मद शाहीद पटेल, निशांत राऊत आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The All-Party Peace Morcha Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.