धापेवाडा प्रकल्पातील चारही पंप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 08:58 PM2018-08-16T20:58:39+5:302018-08-16T20:59:41+5:30
तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे चार पंप ३३ केव्हीच्या वीज पुरवठ्याअभावी मागील काही महिन्यांपासून बंद होते. हे पंप पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पातील चारही पंप सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे चार पंप ३३ केव्हीच्या वीज पुरवठ्याअभावी मागील काही महिन्यांपासून बंद होते. हे पंप पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पातील चारही पंप सुरू करण्यात आले.
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या चार पंपाना तांत्रिक कारणामुळे ३३ केव्ही वीजपुरवठा होत नसल्यामुळे दोन पंप बंद ठेवण्यात आले होते. याची दखल घेत आ.रहांगडाले यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली. या प्रकल्पातील पाणी लाभ क्षेत्रातील शेतकºयांना मिळावे यासाठी पाठपुरावा केला. तसेच प्रकल्पाला भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. त्याचीच दखल संबंधित विभागाने घेत बंद असलेले चारही पंप सुरू केले. यामुळे शेतकºयांना या प्रकल्पातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.रहांगडाले यांनी भेट दिली तेव्हा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता सुनील माहूर्ले, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फालके, कार्यकारी अभियंता श्रेणी १ अहिरराव, कार्यकारी उपअभियंता पंकज गेडाम, प. स. सदस्य पवन पटले, डॉं. बी. एस. रहांगडाले, भाजप तालुका महामंत्री धीरज बरियेकर, घनश्याम पारधी, संजय पारधी, सारंग मानकर, डिलेश पारधी उपस्थित होते.