शेवयांनी घातली सर्वांनाच भुरळ

By admin | Published: July 6, 2016 02:07 AM2016-07-06T02:07:09+5:302016-07-06T02:07:09+5:30

रमजान ईद म्हणताच ‘शिरखुरमा’ डोळ््यांसमोर येते. शेवयांच्या या पदार्थाचे मुस्लीम धर्मात महत्वाचे स्थान

All those laid by the shawas | शेवयांनी घातली सर्वांनाच भुरळ

शेवयांनी घातली सर्वांनाच भुरळ

Next

ईदची सर्वत्र धूम : ठिकठिकाणच्या दुकानांत गर्दी
गोंदिया : रमजान ईद म्हणताच ‘शिरखुरमा’ डोळ््यांसमोर येते. शेवयांच्या या पदार्थाचे मुस्लीम धर्मात महत्वाचे स्थान असल्या तरी या शेवया अन्य धर्मियांच्याही आवडत्या आहेत. यामुळेच शहरातील बाजारात ईदच्या धामधुमीत शेवयांच्या दुकानांत सध्या मुस्लिम बांधवांसह सर्वांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
रहमानप्रमाणेच रमजान हे अल्लाहचे नाव असल्याने रमजानला अल्लाहचा महिना म्हटले जाते. त्यामुळेच मुस्लीम धर्मात सर्वात पाक (पवित्र) महिना म्हणून रमजान मानला जातो. ३० दिवस कालावधींचा असून मुस्लिम वर्षाचा हा नववा महिना आहे. या रमजान महिन्यात रोजा (उपवास) केले जातात.
महिनाभर केलेल्या पूजेच्या मोबदल्यात अल्लाह आनंद साजरा करण्याची संधी देतो व त्यालाच ‘रमजान ईद’ म्हटले जाते. यात ईदची नमाज अदा करण्यासाठी घरून निघताना तोंड गोड करून निघावे लागते. त्यामुळे ईदला शेवई व खजूर खाण्याची परंपरा आहे. शहरात सध्या शेवयांची दुकाने थाटण्यात आली आहेत.
बुधवारची (दि.६) ईद येत असल्याने शहरातील बाजारात सध्या मुस्लीम बांधवांची एकच गर्दी दिसून येत आहे.
यात घरातील सामान, कपडे यांच्यासह शेवई खरेदी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)

शाकाहारी शेवईला सर्वांचीच पसंती
शेवई फक्त मुस्लीमबांधव खातात असे नसून त्याचे चाहते सर्वधर्मीय आहेत. शुद्ध शाकाहारी असा हा पदार्थ असून सर्वच मोठ्या आवडीने या शेवयांची खिर तयार करून खात असतात. मुस्लीम समाजात खिरला महत्व असल्याने शेवयांची खिर म्हणजेच ‘शिरखुरमा’ प्रसिद्ध आहे. अन्य धर्मात शेवयांची खिर आपापल्या पद्धतीने तयार केली जात असल्याचे येथील शेवई विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: All those laid by the shawas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.