जिल्ह्यात सोमवारपासून सर्वच व्यवहार होणार अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:26+5:302021-06-06T04:22:26+5:30

.................... काय राहील सुरू - अत्यावश्यक सेवेसह सर्वच प्रकारची व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू, किरकोळ वस्तू विक्रीची दुकाने, सुपर बाजार, हाॅटेल्स, ...

All transactions in the district will be unlocked from Monday | जिल्ह्यात सोमवारपासून सर्वच व्यवहार होणार अनलॉक

जिल्ह्यात सोमवारपासून सर्वच व्यवहार होणार अनलॉक

Next

....................

काय राहील सुरू

- अत्यावश्यक सेवेसह सर्वच प्रकारची व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू, किरकोळ वस्तू विक्रीची दुकाने, सुपर बाजार, हाॅटेल्स, रेस्टारंट व इतर दुकाने

- सलून, जीम, उद्याने, चित्रपटगृह, बाजारपेठा,

- सर्वच प्रकारची वाहतूक शंभर टक्के सुरू, एसटी बसेस पूर्ण क्षमतेेने सुरू

- प्रार्थना स्थळे, मंदिर, चर्च,

- सर्वच प्रकारच्या फेरीवाल्यांना वस्तूंची विक्री करण्याची परवानगी.

.......................

नियमांचे करावे लागणार काटेकोरपणे पालन

कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येत आहे. निर्बंध पूर्णपणे शिथिल झाल्याने नागरिकांनी बिनधास्तपणे न वागता पूर्वी इतकीच काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन व्यावसायिक आणि नागरिकांना पण करावे लागणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आदी गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.

...............

कोट :

जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट २.५ टक्के असून ऑक्सिजन बेड सुध्दा केवळ ४.८ टक्के भरले आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश होत असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीत व्हावे, आर्थिक गाडी रुळावर यावी, यादृष्टीनेच निर्णय घेण्यात येणार आहे.

- राजेश खवले, जिल्हाधिकारी

................

१) शासनाने कुठले पाच स्तर ठरिवले आहेत? (बॉक्स)

१) पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या स्तरात येईल.

२) पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात येईल.

३) पॉझिटिव्हिटी रेट पाच ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात येईल.

४) पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग चौथ्या स्तरात येईल.

५) पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पाचव्या स्तरात येईल.

.................

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट : २.८ टक्के

सध्या ऑक्सिजन बेडवर : ४५

.................

कोरोनाचे एकूण रुग्ण :

बरे झाले रुग्ण :

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण :

एकूण मृत्यू :

Web Title: All transactions in the district will be unlocked from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.