दिव्यांगांना संगणकीकृत प्रमाणपत्राचे वाटप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:41 PM2018-01-29T20:41:28+5:302018-01-29T20:41:56+5:30
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आता संगणकीकृत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आता संगणकीकृत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अनेक दिव्यांग बांधव त्यांना आवश्यक असलेल्या कृत्रिम साहित्यापासून वंचित आहे. त्यांना प्रमाणपत्र व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी २० ते २३ मार्च दरम्यान गोंदिया येथे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी कळविले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या शिबिराच्या पुर्वतयारीच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपूर्व पावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा नियोजन अधिकारी भूत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, अभिजीत चौधरी उपस्थित होते. बडोले म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांग बांधवांना शिबिराला आणण्याचे काम तालुका यंत्रणेने नियोजनातून करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांग बांधवांसाठी ३ टक्के निधी दिला आहे.त्या निधीचा वापर यासाठी ग्रामपंचायतीने करावा. जिल्ह्यातील आठ तालुक्यासाठी चार ठिकाणी हे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले. दयानिधी म्हणाले, जिल्हा परिषदेची यंत्रणा शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. दिव्यांग बांधवांना त्यांना हवे असलेले प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्रास सहन करण्याची वेळ या शिबिरामुळे येणार नाही.
आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक या शिबिरात सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले. चौधरी यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आशा सेवकांचे प्रशिक्षण घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्ेत उपस्थित होते.
घरपोच मिळणार प्रमाणपत्र
दिव्यांगांना प्रमाणपत्र स्पीड पोष्टने घरपोच तपासणीनंतर पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष मोहीम शिबिरात नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी हे काम करणार आहे. गावस्तरावरील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाºया यंत्रणा जसे- जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, सर्व शिक्षा अभियान, विशेष शाळा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्र म, दिव्यांगाच्या विविध संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींना शिबिराबाबतची माहिती व शिबिरास्थळी आणण्याचे काम करण्यात येणार आहे.
दोन टप्प्यात शिबिर
पहिला टप्पा प्राथमिक तपासणी प्रत्येक तालुक्यात दोन ठिकाणी व प्रत्येक दिवशी दोन शिबिरे असे एकूण २० शिबिराकरीता केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व ग्रामीण रु ग्णालय येथे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करु न निश्चित दिवशी शिबिर घेण्यात येईल. दुसºया टप्प्यात अपंगत्व निदान व निश्चितीकरण करु न शिबिराकरीता अपंगत्व प्रमाणपत्र बोर्ड तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी केटीएस, शासकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण रु ग्णालय येथे शिबिर घेण्यात येईल.
प्रशिक्षणातून देणार माहिती
आरोग्य विभागामार्फत कार्यरत जिल्हा आशा समन्वयक यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा व तालुका समन्वयक, विशेष शिक्षक, शालेय आरोग्य तपासणी पथक, प्रत्येक तालुक्यातील दोन डॉक्टर, विशेष शाळेतील दोन विशेष शिक्षक, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यांचे जिल्हास्तरावर दिव्यांग लाभार्थी माहितीसाठी एक दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. गावातील दिव्यांग व्यक्तीची माहिती विहीत प्रपत्रात आशा सेविकेकडून प्राप्त करण्यासाठी उपरोक्त यंत्रणेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आशा सेविकांचे प्रशिक्षण व आशा सेविकेमार्फत सात दिवसात जिल्हा आशा समन्वयक मार्फत समाज कल्याण विभागाला माहिती देण्यात येईल.