शेतकऱ्यांना तीन दिवसात कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:36 AM2021-07-07T04:36:16+5:302021-07-07T04:36:16+5:30
सडक अर्जुनी : तालुक्यातील परसोडी सडक येथील आदिवासी सोसायटीचा अनागोंदी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून पीक ...
सडक अर्जुनी :
तालुक्यातील परसोडी सडक येथील आदिवासी सोसायटीचा अनागोंदी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले होते.
गेल्या तीन महिन्यांपासून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांना कर्ज मिळाले नव्हते. परिणामी ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. ‘लाेकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच, संस्थेने शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले.
तालुक्यातील परसोडी/ सडक येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे १३० शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केले होते, पण तीन महिन्याचा कालावधी लोटूनही या संस्थेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले नव्हते. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती. या संस्थेच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आले होते. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताना, या संस्थेने ७२ शेतकऱ्यांच्या खात्यात पीककर्जाची रक्कम जमा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.