सर्व बाजार व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:17+5:302021-06-01T04:22:17+5:30
गोंदिया : राज्य शासनाच्या ‘मिशन बिगन’ अंतर्गत ३० मे रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन निर्देशांनुसार सर्व बाजार व दुकानांना ...
गोंदिया : राज्य शासनाच्या ‘मिशन बिगन’ अंतर्गत ३० मे रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन निर्देशांनुसार सर्व बाजार व दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, नवीन दिशा निर्देशांनुसार राज्य शासनाने स्थानिक परिस्थिती बघता सर्व दुकान व बाजार सुरू करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अशात जिल्ह्यात कोरोना संसर्ग आता ओसरत असून, जिल्ह्यातील बहुतांश शासकीय व खासगी रुग्णालयांत मोठ्या संख्येत बेड्स उपलब्ध आहेत. मात्र मागील दीड-दोन महिन्यांपासून बाजार व दुकान बंद असल्याने फक्त दुकानदारच नव्हे, तर दुकानांत काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक तसेच सामान्य नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यास अडचण येत आहे. शिवाय घरी बसून असल्याने नागरिकांची मानसिकता नकारात्मक होत चालली आहे. या सर्व बाबी लक्षात जिल्हा प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घेऊन बाजार व सर्व दुकाने आळी-पाळीने आठवड्यातून किमान पाच दिवस व कोरोना नियमांच्या आदेशाचे कठोरतेने पालन करण्याच्या अटीवर सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन १-२ दिवसांत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निर्देशावरून भाजप उपाध्यक्ष अशोक चौधरी व शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या नेतृत्वात निवेदन देताना कमल पुरोहित, जे. सी. तुरकर, भाऊलाल तरोणे, विशाल अग्रवाल, राजू गौतम, जसपालसिंग चावला, आत्माराम दसरे, अंकित जैन, सुमित महावत, पारस पुरोहित, रोहन रंगारी, पंकज रहांगडाले, संदीप रहांगडाले, व्यंकट पाथरू, विठ्ठल करंडे, सुशील राऊत, संदीप श्रीवास, मनीष पोपट, दीपक नेवारे, लखनलाल गौतम, महेंद्र पुरोहित, बंटी पंचबुद्धे, गुड्डू चांदवानी, अशोक जयसिंघानी, ॲड. विक्की चांदवानी व कार्यकर्ता उपस्थित होते.