कलावंतांचे कार्यक्रम घेण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:01+5:302021-09-26T04:31:01+5:30
गोरेगाव : जिल्ह्यातील कलावंतांचे कार्यक्रम घेण्यास परवानगी व कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन प्रतिभावंत प्रबोधनकार कला ...
गोरेगाव : जिल्ह्यातील कलावंतांचे कार्यक्रम घेण्यास परवानगी व कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने आ. सहसराम कोरोटे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तहसीलदार सचिन गाेस्वामी यांना शुक्रवारी (दि.२४) देण्यात आले.
निवेदनातून जिल्ह्यातील कलावंतांचे कार्यक्रम घेण्यास परवानगी व कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने कलावंतांचा रोजगार हिरावला गेला आहे. सामाजिक, धार्मिक, लग्न सोहळे, या कार्यक्रमात गायन सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे कलावंत व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमांवरील बंदी उठविण्याची मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात आ. सहसराम कोरोटे, माजी आमदार दिलीप बन्सोड, पी.जी. कटरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. नामदेव किरसान, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, जगदीश येरोला, राहुल कटरे, खिरचंद येळे, प्रकाश पंचभाई, कला साहित्य संघाचे अध्यक्ष आदेश थुलकर, सचिव नितीन साखरे यांचा समावेश होता.