कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:39+5:302021-05-20T04:30:39+5:30
साखरीटोला : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सालेकसा तालुक्यातील साखरीटोला, सातगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सर्व ...
साखरीटोला : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सालेकसा तालुक्यातील साखरीटोला, सातगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सर्व सुविधांयुक्त २० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी भाजप आदिवासी आघाडीच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात अनेक रुग्ण बेड उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू पावलेले आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता गाव परिसरातून जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी बरेच अंतर पार करावे लागते. देवरी, आमगाव, सालेकसा या तिन्ही तालुक्यांत मध्यस्थळी असलेले साखरीटोला हे अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला, सातगाव हे आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे आदिवासी व परिसरातील जनतेला सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्ष आदिवासी आघाडीने साखरीटोला येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सर्व सुविधायुक्त २० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात भाजप आदिवासी आघाडीचे चंद्रसेन मरकाम, भाजप व्यापारी आघाडीचे महामंत्री सुनील अग्रवाल, नगर पंचायतचे बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, युवा आघाडीचे आदित्य शर्मा, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, भाजप युवा मोर्चा आघाडीचे महामंत्री देवराम चुटे यांचा समावेश होता.