अल्फा व डेंडूचा शोध सुरू

By admin | Published: April 2, 2016 02:21 AM2016-04-02T02:21:36+5:302016-04-02T02:21:36+5:30

केंद्र शासनाद्वारे गठित एनटीसीए (नॅशनल टायगर कंझर्वेशन एडमिनिस्ट्रेशन) द्वारे नागझिरा अभयारण्यात बेपत्ता वाघीन अल्फा व वाघ डेंडू यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Alpha-Dendo's search started | अल्फा व डेंडूचा शोध सुरू

अल्फा व डेंडूचा शोध सुरू

Next

कमिटी गठित : नागझिरा अभयारण्यात दोन छाव्यांसह दिसली टी-४ वाघीण
गोंदिया : केंद्र शासनाद्वारे गठित एनटीसीए (नॅशनल टायगर कंझर्वेशन एडमिनिस्ट्रेशन) द्वारे नागझिरा अभयारण्यात बेपत्ता वाघीन अल्फा व वाघ डेंडू यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सध्या नागझिरा अभयारण्यात पर्यटकांना केवळ अल्फाची मादा संतान टी-४ आपल्या दोन छाव्यांसह दिसत आहे.
केंद्र शासनाने वाघांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एनटीसीएची स्थापना केली आहे. गोंदिया जिल्ह्यात वाघांवर नजर ठेवण्यासाठी तीन सदस्यीय कमिटी गठित करण्यात आली आहे. यात सेवानिवृत्त डीएफओ अशोक खुने, वनमित्र सावन बहेकार व वनमित्र राजकुमार जोब यांचा समावेश आहे. सदर तिन्ही सदस्यांचा उद्देश्य मागील वर्षापर्यंत नागझिरा अभयारण्यात दिसणाऱ्या अल्फा वाघीन व तिच्या दोन छाव्यांचा शोधून काढणे आहे. तसेच सदर तिन्ही सदस्य नागझिरा येथील डेंडू वाघालासुद्धा शोधणार आहेत.
नागझिरा अभयारण्यातील नियमित भेट देणाऱ्यांशी जेव्हा लोकमतने चर्चा केली, तेव्हा ही बाब समोर आली की, दरवर्षी नागझिरा येथे कोणतीतरी वाघीन आपल्या छाव्यांसह दिसून येते. परंतु छावे मोठे झाल्यावर ते नंतर दिसून येत नाही.
वनांतील माहिती तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोठे झाल्यावर छावे आपल्या मातेला सोडून आपला वेगळा क्षेत्र निवडतात. नागझिरा येथे दिसणारे छावे मोठे झाल्यावर जवळपासच्या जंगलात दिसायला हवे. यात नागझिऱ्याचे छावे जवळपासच्या जंगलात आहेत, असे म्हटले जावू शकते. परंतु जिल्ह्यातील वन्यजीव विभागाजवळ याबाबत काही ठोस प्रमाण नाही.
मागील तीन वर्षांत लहानसहान शिकारी नागझिरा अभयारण्य व न्यू नागझिरा अभयारण्यात सापडले आहेत. यातून वाघांच्या शिकारीची पुष्टी होत नाही, परंतु या बाबीला नाकारतासुद्धा येत नाही. वनक्षेत्रात लागलेले कॅमेरे व निरीक्षण यातून आतापर्यंत वाघांच्या शिकारीची पक्की माहिती नाही. मात्र एनटीसीए नागझिरा येथील अल्फा व तिचे दोन छावे तसेच डेंडूला शोधून काढतील, अशी आशा आहे. त्यासाठी सदर कमिटी आणखी काय उपाययोजना आखते, यावर बरेचकाही निर्भर आहे.
पाणझळीचा ऋतू सुरू आहे. नागझिरा येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. पाण्याच्या टाक्यांजवळ व इकडेतिकडे फिरत रानगवे, हरिणांच्या विविध प्रजाती तसेच इतर वन्य प्राण्यांना पाहून पर्यटक आनंदित दिसत आहेत. गरज केवळ या बाबीची आहे की, नागझिरा अभयारण्यात वाघ-वाघीनींची संख्या वाढावी. (प्रतिनिधी)

Web Title: Alpha-Dendo's search started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.