सदैव शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2017 01:29 AM2017-06-12T01:29:17+5:302017-06-12T01:29:17+5:30

महालगाव येथे नुकतेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.

Always restricted for the development of the farmers | सदैव शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबध्द

सदैव शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबध्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : महालगाव येथे नुकतेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. विजय रहांगडाले म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्येंवर प्रकाश टाकत शेतकऱ्यांसाठी नेहमी प्रयत्नशील राहत धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रं.१ चे पाणी खळबंदा तलावात सोडण्यासाठी २००९ पासून केलेल्या प्रयत्नांना आढावा घेतला. टप्पा क्रं.२ चे पाणी बोदलकसा व चोरखमारा तलावात पाणी सोडण्याच्या कार्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यांचे ई-टेंडरिंग प्रक्रिया मार्गात आहे. सिंचनाच्या सोयीसाठी नेहमी प्रयत्नरत असून पाठपुरावा आहे. कार्यक्रमाला आ. गोपालदास अग्रवाल, कृऊबास तिरोड्याचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, शिक्षण व क्रिडा सभापती पी.जी.कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपूरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स.सदस्य निता पटले, विना टेंभरे, सरपंच जितेंद्रसिंह नैकाने, दसाराम आगाशे व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Always restricted for the development of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.