रुग्णसेवेसाठी दिली रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:43+5:302021-05-09T04:29:43+5:30
तिरोडा : कोविड संसर्ग काळात रुग्णवाहिकांवरील ताण प्रचंड वाढला आहे. अपुऱ्या रुग्णवाहिकांमुळे बऱ्याचदा रुग्णवाहिका मिळत नसल्याने, रुग्ण दगावत असल्याच्या ...
तिरोडा : कोविड संसर्ग काळात रुग्णवाहिकांवरील ताण प्रचंड वाढला आहे. अपुऱ्या रुग्णवाहिकांमुळे बऱ्याचदा रुग्णवाहिका मिळत नसल्याने, रुग्ण दगावत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेत आ.विजय रहांगडाले यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांचा निधी रुग्णवाहिका खरेदीसाठी उपलब्ध करून दिला. नुकतीच ही रुग्णवाहिका रुग्ण सेवेत दाखल झाली आहे.
तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या दोन्ही तालुक्यांत पुरेशा आरोग्यविषयक सोयी नसल्याने रुग्णांना उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करावे लागते. यासाठी रुग्णवाहिकेची समस्या येत होती. हीच समस्या मार्गी लावण्यासाठी नवीन रुग्णवाहिका खरेदीसाठी आ.विजय रहांगडाले यांनी स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रुग्णवाहिकेअभावी होणारी रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.