शहरामध्ये दररोज ३० ते ४० रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:01+5:302021-04-28T04:32:01+5:30

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने गोंदिया शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शहरातील दहा-बारा ...

Ambulance wanders in the city with 30 to 40 patients every day ..! | शहरामध्ये दररोज ३० ते ४० रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती..!

शहरामध्ये दररोज ३० ते ४० रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती..!

Next

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने गोंदिया शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शहरातील दहा-बारा रुग्णालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत. बेड मिळेल का याची चौकशी करण्यासाठी रुग्णाला घेऊन रुग्णालयाच्या दारावर जाणाऱ्या रुग्णांना बेडची वाट पाहत रुग्णवाहिकेतच बहुतांश वेळ घालवावा लागतो. कोविड रुग्णांना त्यांचा सीटीस्कॅन स्कोअर किती आहे हेही पाहण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागते. रुग्णांचे सीटीस्कॅन काढण्यासाठीही मोठी गर्दी राहत असल्याने आलेल्या रुग्णांना प्रतीक्षा यादीनुसार त्यांची चाचणी केली जात आहे. पॉझिटिव्ह असलेला रुग्ण आधीचाच हतबल हाेत असून, त्याला बेड मिळविण्यासाठीच अनेक रुग्णालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने रुग्ण व रुग्णवाहिका चालकही त्रस्त होतात.

.......

कोरोना रुग्णांवर उपचार करणारी रूग्णालये---- एकूण बेडची संख्या---- उपलब्ध बेडची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (डीसीएच) ------- १००------------------- ००

सेंट्रल हॉस्पिटल, गोंदिया--------------------------- १४०------------------- ००

सहयोग हॉस्पिटल, गोंदिया-------------------------१००------------------- ००

श्री राधेक्रिष्ण हॉस्पिटल, गोंदिया --------------------८५------------------- ००

बाहेकर हॉस्पिटल, गोंदिया-------------------------- ६५------------------- ००

के. एम. जे. हॉस्पिटल, गोंदिया-- -------------------- ४०------------------- ००

मीरावंत हॉस्पिटल, गोंदिया------------------------- २९------------------- ००

गायत्री हॉस्पिटल, गोंदिया------------------------- २८------------------- ००

आयुष क्रिटिकल केअर ------------------------- २५------------------- ००

गोंदिया सिटी हॉस्पिटल ------------------------- ११------------------- ०४

हिलिंग हँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल ----------०९------------------- ००

अनन्या हॉस्पिटल गोंदिया------------------------- ०९------------------- ००

सिद्धिविनायक हॉस्पिटल ------------------------ १५------------------- ००

राणी अवंतीबाई हॉस्पिटल ------------------------- २०------------------- ००

....................................

पाच फेऱ्या झाल्या

सकाळपासून सायंकाळपर्यंत अशा पाच फेऱ्या केल्या. बेड मिळत नाही म्हणून अनेक रुग्णालये गाठली; परंतु आता बेड मिळेल म्हणून एका खासगी रुग्णालयात रुग्ण बेड मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे, असे एका रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले.

...

तीन फेऱ्या झाल्या

आणखी रुग्णवाहिका घेऊन जाणार

अर्जुनी-मोरगाववरून आलेल्या रुग्णाला बेड मिळावा यासाठी खासगी रुग्णालयात जाऊन चौकशी केली; परंतु बेड मिळत नसल्याने रुग्णाला शेवटी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

.........................................

सहा फेऱ्या मारल्या

आमगाव ते गोंदिया अशा सहा फेऱ्या आपण केल्या आहेत. रुग्णांना गोंदियाला सोडायचे आहे असा कॉल आला की आपण हजर होतो. रुग्णांना खासगी की सरकारी ज्या रुग्णालयात जायचे असेल त्या रुग्णालयात पोहोचवितो, असे रुग्णवाहिका चालकाने सांगितले.

Web Title: Ambulance wanders in the city with 30 to 40 patients every day ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.