आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:08 AM2017-09-07T01:08:42+5:302017-09-07T01:08:58+5:30

आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण सोडत बुधवार (दि.६ ) रोजी नगर परिषद सभागृहात काढण्यात आली. प्रभाग आरक्षण सोडतीत दहा प्रभागातील दहा महिलांना नगरसेवक बनण्याची संधी मिळणार आहे.

Amgaon City Council Ward Reservations | आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण जाहीर

आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण जाहीर

Next
ठळक मुद्देदहा महिला प्रतिनिधींना संधी : मतदारांना आता वेध निवडणूकीचे

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण सोडत बुधवार (दि.६ ) रोजी नगर परिषद सभागृहात काढण्यात आली. प्रभाग आरक्षण सोडतीत दहा प्रभागातील दहा महिलांना नगरसेवक बनण्याची संधी मिळणार आहे.
प्रशासक व तहसीलदार साहेबराव राठोड, उपविभागीय अधिकारी अशोक कटारे, नगर परिषद प्रभारी मुकेश मिश्रा, संतोष हावरे यांनी आरक्षण सोडत व पुरुष प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण केली. आमगाव नगर परिषदेत एकूण दहा प्रभाग असून सदस्य संख्या २० निश्चित करण्यात आली. प्रभाग आरक्षण सोडतीत दहा महिलांसाठी आरक्षित प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले. नगर परिषद प्रभाग रचना आरक्षणात प्रभाग क्रमांक एक मध्ये नामाप्र महिला, सर्वसाधारण प्रत्येक एक, प्रभाग क्रमांक दोनमध्ये नामाप्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग तीन अनुसूचित जमाती व महिला सर्वसाधारण, प्रभाग चार अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग पाच नामाप्र महिला व सर्वसाधारण प्रभाग सहा नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग सात सर्व साधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग आठ नामाप्र व सर्वसाधार महिला, प्रभाग नऊ अनुसूचित जाती, व सर्व साधारण महिला, प्रभाग दहा अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण असे आरक्षण काढण्यात आले. या वेळी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Web Title: Amgaon City Council Ward Reservations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.