सिंचनाच्या सोयीसाठी मिळणार हवा तेवढा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 12:56 AM2017-02-20T00:56:04+5:302017-02-20T00:56:04+5:30
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन तलाव एकत्रीकरणासाठी सोनेगाव (ता. गोरेगाव) येथे एकूण ४९ लाख ६९ हजार ७७० रुपये आ. विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले.
तिरोडा : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन तलाव एकत्रीकरणासाठी सोनेगाव (ता. गोरेगाव) येथे एकूण ४९ लाख ६९ हजार ७७० रुपये आ. विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. त्या कार्याचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सिंचन योजनेसाठी लागणार तेवढा निधी मी शासनाकडून उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील आहे, असे आश्वासन आ. विजय रहांगडाले यांनी दिले. कामाच्या दर्ज्याकडे जनतेने स्वत: लक्ष द्यावे. जर काम निकृष्ट दर्जाचे दिसून आल्यास त्याची तक्रार माझ्यापर्यंत करावी, असेही सांगितले.
याप्रसंगी जि.प.सदस्य रोहिनी वरखडे, सरपंच राजकुमार तुरकर, उपसरपंच उर्मिला खांडगाये, कार्य अभियंता विलास निखारे, शाखा अभियंता राजेंद्र कपूर, पोलीस पाटील प्रकाश पारधी, राधेशाम अग्रवाल, ग्रा.पं. सदस्य सुरेश शरणागत, प्रिया रहांगडाले, वैशाली भोयर, तंमुस अध्यक्ष मुनेश्वर वाढई, सरपंच धनराज वाढई, फुलीचंद पारधी, किशोर ठाकुर, विवेक ढोरे व गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)