कीटकनाशक फवारणीमुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, सालेकसा तालुक्यातील घटना

By कपिल केकत | Published: August 17, 2023 04:45 PM2023-08-17T16:45:25+5:302023-08-17T16:47:44+5:30

मृत्यूच्या फवारणीचा फास

An elderly farmer died of poisoning while spraying pesticides, an incident in Salekasa taluka | कीटकनाशक फवारणीमुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, सालेकसा तालुक्यातील घटना

कीटकनाशक फवारणीमुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, सालेकसा तालुक्यातील घटना

googlenewsNext

गोंदिया : शेतात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने ६४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम पांढरी येथे १६ ऑगस्ट रोजी ४:१५ वाजता दरम्यान घडली. चैनदास गोरेलाल माहुले (६४,रा.पांढरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

चैनदास माहुले हे आपल्या शेतात धान पिकावर फवारणी करीत होते. मात्र यामध्ये त्यांना कीटकनाशकाची विषबाधा झाल्याने त्यांचा त्यातच मृत्यू झाला. फिर्यादी राकेश चैनदास माहुले (२४,रा. पांढरी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: An elderly farmer died of poisoning while spraying pesticides, an incident in Salekasa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.