दारू पिऊन वर्ग खोलीतच झोपला शिक्षक; कारवाई होतेय मागणी, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:46 PM2022-12-22T22:46:05+5:302022-12-22T22:49:57+5:30

दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांना हा प्रकार माहित होताच शाळा गाठली.

An incident has taken place in a school at Nimba in Gondia where teacher slept while drinking alcohol An incident has taken place in a school at Nimba in Gondia where teacher slept while drinking alcohol | दारू पिऊन वर्ग खोलीतच झोपला शिक्षक; कारवाई होतेय मागणी, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

दारू पिऊन वर्ग खोलीतच झोपला शिक्षक; कारवाई होतेय मागणी, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

googlenewsNext

गोरेगाव (गोंदिया) : समाजात शिक्षकाचे स्थान आदर्श आहे. मात्र जिल्ह्यातील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला बदनाम केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या निंबा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत घडला. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा विविध कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी गळणार्या वर्गखोल्या, शिक्षकांची रिक्त पदे, विद्यार्थ्यांची गळती अशी विविध कारणे असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ग्रामीण भागातील शाळा टिकविण्याचे आव्हान आहे. त्यातच आता गोरेगाव तालुक्यातील निंबा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा वेगळाच प्रताप पाहावयास मिळाला. येथे कार्यरत शिक्षक जी.आर.मरसकोल्हे हे शाळेत दारू पिऊन आले. झिंगतच त्यांनी वर्गखोलीत प्रवेश केला. त्यांची अवस्था बघून विद्यार्थी घाबरले. त्यांनी याची माहिती मुख्याध्यापक नंदेश्वर तथा आपल्या पालकांना दिली.

दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांना हा प्रकार माहित होताच शाळा गाठली. यावेळी शिक्षक मरसकोल्हे हे वर्गखोलीत झोपून होते. यावेळी शिक्षक तथा कर्मचार्यांनी दारुड्या शिक्षकाला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान निंबाच्या सरपंच वर्षा पटले, पंचायत समिती सदस्य राकेश पंधरे, बुधराम बिजेवार, पालक, गावकरी यांनी गोरेगाव पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भातील तक्रार नोंदविली. शिक्षकाच्या या प्रतापामुळे गावकरी व पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.

तीन वर्षांपूर्वी निलंबित

शिक्षक मरसकोल्हे यांना दारूचे व्यसन आहे. देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. शिक्षण आयुक्तांकडे कारवाई संदर्भातील प्रकरण प्रलंबित आहे. तसेच शिक्षक मरसकोल्हे यांच्यावर कारवाईसाठी जून व सप्टेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शिरसाठ यांनी सांगितले.

निंबा शाळेत शिक्षक दारू पिऊन असल्याची माहिती मिळाली, गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याची सूचना दिली आहे. अहवाल प्राप्त होताच कारवाई करणार आहे.
- डॉ. महेंद्र गजभिये, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गोंदिया

निंबा शाळेतील प्रकार निंदनीय आहे. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन झाली आहे.माहिती मिळताच पंचायत समिती येथील कर्मचार्यांना निंबा येथे पाठवून पंचनामा करून शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शिक्षकावर पंचायत समिती स्तरावरून कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार असल्याचे गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले.

Web Title: An incident has taken place in a school at Nimba in Gondia where teacher slept while drinking alcohol An incident has taken place in a school at Nimba in Gondia where teacher slept while drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.