गोंदियाचे लाेकाे पायलट स्नेहसिंह बघेल यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

By अंकुश गुंडावार | Published: June 8, 2024 04:53 PM2024-06-08T16:53:17+5:302024-06-08T16:55:55+5:30

रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद : बघेल यांच्या उत्कृष्ट कार्याची घेतली दखल

An invitation to the Prime Minister's swearing-in ceremony to the pilot Snehsingh Baghel of Gondia | गोंदियाचे लाेकाे पायलट स्नेहसिंह बघेल यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

An invitation to the Prime Minister's swearing-in ceremony to the pilot Snehsingh Baghel of Gondia

गोंदिया : पतंप्रधान नरेंद्र माेदी हे मोदी रविवारी (दि.९) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यासाठी देश, विदेशातील विविध मान्यवरांना आमंत्रीत करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागातंर्गत गोंदिया येथे कार्यरत सहाय्यक लोकाे पायलट स्नेह सिंह बघेल यांना निमंत्रीत करण्यात आले. बघेल यांना हे निमंत्रण वंदे भारत टीमचे एक प्रमुख सदस्य म्हणून मिळाल्याची माहिती आहे. यामुळे गोंदिया विभागातील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

स्नेह सिंह बघेल हे दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागाच्या गोंदिया लाॅबीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लोकोपायलट म्हणून गेल्या चार वर्षापासून आहे. वंदे भारत ट्रेनसह इतर रेल्वे गाड्यांसाठी बघेल यांनी केलेल्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून त्यांना रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रीत केल्याची माहिती आहे. बघेल हे मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशिक्षण प्राप्त करणारे सहाय्यक लोको पायलट आहेत. बघेल नागपूर-बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसच्या शुभारंभा दरम्यान लोकाेपायलटच्या दलात सुध्दा सहभागी होते. बघेल यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण असून हा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक आणि दर्जेदार सुविधांसाठी देशभरात ओळखली जात असून या ट्रेनमध्ये प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक व दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक लोको पायलट स्नेह सिंह बघेले हे कार्यरत आहे. त्यांच्या याच कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्याचे बोलल्या जाते.

हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळणे ही माझ्यासाठी समस्त रेल्वे विभागासाठी गौरवाची बाब आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्याची संधी मला मिळाली आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून ते अधिक उत्फुर्तपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल.
- स्नेहसिंह बघेल, वरिष्ठ सहाय्यक लोकोपायलट, गोंदिया

बघेल दिल्ली दाखल

स्नेहसिंह बघेल हे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या शपथविधी सोहळयाला उपस्थित होण्यासाठी गोंदियाहून शुक्रवारी (दि.७) दिल्लीला पोहचले. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांना शुक्रवारीच दिल्ली येथे पोहचण्याचा निरोप पंतप्रधान कार्यालयाने दिला होता. त्यामुळे बघेल हे शुक्रवारी विमानाने दिल्ली पोहचले.

Web Title: An invitation to the Prime Minister's swearing-in ceremony to the pilot Snehsingh Baghel of Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.