अंगावर भिंत पडून वृद्ध महिलेचा मृत्यू, देवरी तालुक्यातील घटना
By नरेश रहिले | Updated: August 19, 2023 17:40 IST2023-08-19T17:39:53+5:302023-08-19T17:40:03+5:30
आकस्मिक मृत्यूची नोंद

अंगावर भिंत पडून वृद्ध महिलेचा मृत्यू, देवरी तालुक्यातील घटना
गोंदिया : जेसीबीने काम करीत असतांना जेसीबीचा धक्का भिंतीला लागल्याने ती भिंत वृद्ध महिलेच्या अंगावर पडली. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंजुळा सदाशिव यावलकर (७०) रा. मुल्ला ता. देवरी असे मृत वृद्धेचे नाव आहे.
१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:१५ वाजता त्यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा प्रथमोपचार मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून पुढील उपचारासाठी सायंकाळी ७ वाजता गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपासासाठी कागदपत्रे देवरी पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहेत.