नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा

By अंकुश गुंडावार | Published: June 28, 2023 11:00 AM2023-06-28T11:00:37+5:302023-06-28T11:03:21+5:30

अरततोंडी ते पिंपळगाव खांबी नाल्यातील घटना

An unknown person who was swept away in the flood of the drain are from Jharpada village of gondiya dist | नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा

नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा

googlenewsNext

अर्जुनी मोरगाव : अरततोंडी-पिंपळगाव मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पुरात वाहून गेलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली आहे.तो इसम झरपडा येथील रहिवासी असून त्याचे नाव अरविंद गणपत ठाकरे असे आहे.पुलावरील पाणी कमी झाले नसल्याने अद्याप त्याचा शोध लागला नाही.

अरविंद हा मूळचा चापटी या गावचा रहिवासी आहे.त्याचे सुरगाव येथे शेत आहे.झरपडा येथे घरजावई म्हणून तो वास्तव्यास होता.मंगळवारी तो शेतात लागवड केलेले धानाचे रोप पाहण्यासाठी झरपडा येथून सकाळी सायकलने  निघाला.अरततोंडी-पिंपळगाव मार्गावरील नाल्याच्या पुलावरून  पाणी वाहत होते. पुलावर खूप जास्त पाणी नव्हते.मात्र सायकल हातात असल्याने तो सायकलसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

Video : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नाल्याच्या पुरात एकजण सायकलसह वाहून गेला

तलाठी सुरेश हरिणखेडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मंगळवारी रात्रीपर्यंत नाल्याच्या काठावर शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.तो रात्री घरी परतला नाही.बुधवारी पहाटे अरविंदचे कुटुंबीय घटनास्थळी आले.पुरात वाहून गेलेला अज्ञात इसम हा अरविंदच असल्याची खातरजमा झाली आहे.

Web Title: An unknown person who was swept away in the flood of the drain are from Jharpada village of gondiya dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.