अन् ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 09:52 PM2018-01-25T21:52:29+5:302018-01-25T21:52:47+5:30

सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष .....

And Bindal's repetition was avoided | अन् ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली

अन् ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली

Next
ठळक मुद्देहरसन हॉटेलमध्ये आगीची घटना : वेळीच उपाययोजनेने हानी टळली

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.१४) शहरातील हरसन हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे पथक वेळीच दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आल्याने ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली अशीच चर्चा शहरवासीयांमध्ये आहे.
२१ डिसेंबर २०१६ रोजी बिंदल हॉटेलमधील आगीची घटना जिल्ह्याच्या इतिहासात काळ््या शाईने लिहिल्या गेली. सात जणांचा बळी घेणाऱ्या या घटनेनंतर इमारत मालक व अग्निशमन विभागाच्या डोक्यावर खापरही फोडण्यात आले. यावर अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स, लॉन, लॉज, दवाखाने व अन्य प्रतिष्ठांनाना फायर आॅडीट करविण्यासाठी नोटीस बजाविले होते. मात्र याला फार अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. मागील रविवारी (दि.१४) शहरातील हरसंस हॉटेल मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहरातील मोठे हॉटेल आणि व्यावसायीक प्रतिष्ठानांच्या फायर आॅडीटचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला. या हॉटेलचे अद्यापही फायर आॅडीट करण्यात आले नसल्याचे बोलल्या जाते. या हॉटेलमध्ये फायर इस्टिंगविशर सिलेंडर ठेवण्यात आले आहेत. येथे आगीची घटना घडताच लगेच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच उपाय योजना करीत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी घटना टळली. अन्यथा पुन्हा बिंदलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने हरसन हॉटेललाही नोटीस दिली होती.
६० जणांना बजावली नोटीस
अग्निशमन विभागाचे निरीक्षक प्रकाश कापसे सेवानिवृत्त झाल्यानंतर छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन विभागाचा कारभार आला. त्यांनी आतापर्यंत शहरातील केटीएस रुग्णालयाला अग्निशमन यंत्रणेतील काही दुरूस्त्यांसाठी तर अन्य खाजगी दवाखाने, लॉज, लॉन, रेस्टॉरेंट, खाजगी शाळा, हॉटेल्स, सुपर मार्केट अशा ६० व्यावसायीक प्रतिष्ठानांना फायर आॅडीटसाठी नोटीस दिले आहे. मात्र यानंतरही आत्तापर्यंत केवळ १० प्रतिष्ठानांचे फायर आॅडीट झाले असून १५ जणांनी काम सुरू केले असल्याची माहिती पटले यांनी दिली. यातून बिंदलच्या घटनेनंतरही शहरातील व्यवसायी किती जागरूक झाले याची प्रचिती येते.
परवाना विभागाचेच सहकार्य नाही
शहरात किती हॉटेल्स, लॉज व अन्य प्रतिष्ठान आहेत याची माहिती नगर परिषद परवाना विभागाकडे असते. या प्रतिष्ठांनाची यादी अग्निशमन विभागाला मिळाल्यास त्यांना नोटीस देणे सोयीचे होणार आहे. मात्र परवाना विभागाकडून अशा प्रकारची यादी अग्निशमन विभागाला अद्यापही देण्यात आली नाही. परिणामी पटले यांना शहरात फिरून अशा या प्रतिष्ठानांना नोटीस द्यावे लागत असल्याने यात बराच वेळ जात आहे. एकीकडे अग्निशमन विभागात कर्मचाºयांची कमतरता असताना ही महत्वाचे कामे कशी करायची असा प्रश्न या विभागाच्या अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे.

Web Title: And Bindal's repetition was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.