अन् कुलूप लागलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:24 PM2019-02-25T22:24:48+5:302019-02-25T22:25:44+5:30

कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व पंचायत विभागात कार्यरत ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्तव तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठविण्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिल्यामुळे पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी पंचायत विभागात कुलूप ठोकण्याचा दिलेला इशारा सोमवारी मागे घेतला.

And not the lock | अन् कुलूप लागलेच नाही

अन् कुलूप लागलेच नाही

Next
ठळक मुद्देकाळी फिती लावून कर्मचाऱ्यांनी केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व पंचायत विभागात कार्यरत ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्तव तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठविण्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिल्यामुळे पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी पंचायत विभागात कुलूप ठोकण्याचा दिलेला इशारा सोमवारी मागे घेतला. तर कर्मचाºयांनी काळी फित लावून सभापतींनी शुक्रवारी केलेल्या कृतीचा निषेध नोंदविला.
सभापती शिवणकर यांनी पंचायत समितीचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असतात. लोकांची कामे वेळेवर होत नाही. पंचायत समितीच्या मासीक सभेत घेण्यात आलेल्या पारित ठरावांवर कारवाई होत नाही म्हणून शुक्रवारी कर्मचाºयांच्या बाकावरील काच फोडले व खुर्च्याची फेकाफेक करुन संताप व्यक्त केला होता. त्यांनी त्याच दिवशी पंचायत विभागात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायतींची चौकशी न करने, सर्वसाधारण सभेने पारित केलेल्या ठरावावर कार्यवाही न करणे तसेच इतर प्रलंबित प्रशासकीय कामकाजांवर चौकशी होत नसल्याने सोमवारी (दि.२५) पंचायत विभागाला कुलूप ठोकण्याचा लेखी इशारा दिला होता.
त्यानुसार सोमवारी (दि.२५) कुलूप ठोकणार यासाठी समस्त तालुकावासीयांचे लक्ष पंचायत समितीकडे लागले होते. मात्र सभापतींचा हा बार फुसका निघाला. त्यांनी सोमवारी सकाळी सर्व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रित केले होते. यात केवळ सत्ताधारी पक्षाचे सदस्य उपस्थित झाले होते. विरोधक मात्र अनुपस्थित होते. विरोधी पक्ष सदस्यांच्या अनुपस्थितीचा विषय चर्चेचा होता. पंचायत समितीकडे फारसे न फिकरणारे सत्ताधारी पक्षाचे काही वरिष्ठ नेते मात्र कुलूप ठोकण्याचा प्रकार होऊ नये यासाठी फिरकतांना दिसून येत होते. तर गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार हे याप्रकरणी सभापती व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांशी बोलून हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर सभापतींनी कुलूप ठोकलेच नाही.कार्यालय सुरु होताच कर्मचारी संघटनेने एका सभेचे आयोजन करुन या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फित लावून कामकाज करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुपारी गटविकास अधिकाºयांना लेखी निवेदन दिले.
संघटनेने लावले आरोप
कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद तालुका शाखेच्यावतीने गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात वरिष्ठ महिला अधिकारी व आमच्या अधिकाºयांना वारंवार शिव्या देणे, कार्यालयीन वेळेत दिवसभर सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना वारंवार आपल्या कक्षात बोलावणे व इतरांसमोर कर्मचाºयांसोबत अशोभनीय व अपमानास्पद भाषेत बोलणे, रात्री उशीरापर्यंत थांबवून शासकीय कामाऐवजी वायफळ गोष्टी बोलणे, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांकडून आपल्या घराची कामे जबरदस्तीने करुन घेणे याप्रकारचे सभापती शिवणकर यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत. सभापतींवर शासकीय मालमत्तेची नासधूस केल्याप्रकरची कायदेशीर कारवाई करुन निर्भय वातावरण उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
आरोप बिनबुडाचे-सभापती
कर्मचारी संघटनेने लावलेले आरोप बिनबुडाचे असून ते आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी या पद्धतीचे खोटे निवेदन देवून नाहक बदनाम करीत आहेत. मुळात कर्मचाऱ्यांमध्ये अनेक दोष आहेत. कलम ७७ अ नुसार सरपंच समितीची सभा ही प्रत्येक महिन्यात घेतली पाहिजे. मात्र ही सभा तब्बल आठ महिन्यानंतर घेण्यात आली. कृषी विभागातील संगणक आॅपरेटर रजेवर असतांना अनाधिकृत कर्मचाऱ्याला स्वमताने कामावर घेऊन कार्यालयीन कामकाजाच्या गोपनीयतेचा भंग केला जातो. आपण केलेली कृती ही लोकांना त्रास होवू नये त्यांची कामे वेळेत व्हावीत या उद्देशाने लोकहितार्थ केली आहे. कर्मचारी आपले कृत्य दपडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून याप्रकारे दबाव आणत असतील तर हे योग्य नसल्याचे मत सभापती अरविंद शिवणकर यांनी व्यक्त केले.

Web Title: And not the lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.