अन्...ठाणेदाराने केला धमकीचा व्हिडिओ डिलिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 09:43 PM2017-09-08T21:43:16+5:302017-09-08T21:43:36+5:30

रिसामा येथील देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गावातील महिलांनी एल्गार पुकारात उपोषण सुरू केले.

And ... Thane's threat of video threatens to delete | अन्...ठाणेदाराने केला धमकीचा व्हिडिओ डिलिट

अन्...ठाणेदाराने केला धमकीचा व्हिडिओ डिलिट

Next
ठळक मुद्देरिसामा दारू दुकान प्रकरण : दारु दुकान हटविण्यासाठी महिलांचे उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : रिसामा येथील देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गावातील महिलांनी एल्गार पुकारात उपोषण सुरू केले. या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी ठाणेदारच महिलांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप महिलांचा आहे. दरम्यान ठाणेदारांच्या दमदाटीचा प्रकार उपस्थित काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. दरम्यान हा प्रकार ठाणेदाराच्या लक्षात येताच त्यांनी मोबाईल ताब्यात घेत व्हिडिओ डिलिट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गुरूवारी सायंकाळी ठाणेदार शशीकांत दसुरकर यांनी महिलांना तंबी देत त्यांना विविध प्रकारचे उदाहरण देत धडकी भरेल अशी धमकी दिली. परंतु त्या धमकीला महिलांनी भीक घातली नाही. हे पाहून ठाणेदारांने त्यांच्यावर आग ओकने सुरू केले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ उपोषण मंडपातील दहा-बारा महिलांनी तयार केला. दरम्यान व्हिडिओ एसपीकडे पोहचल्यास मोठी पंचाईत होईल, या भीतीने ठाणेदाराने पोलिस कर्मचाºयांना आदेश देत त्या महिलांचे मोबाईल ताब्यात केलेल्या चित्रीकरणाचा व्हिडिओ डिलिट केला.
आमगाव तालुक्यातील रिसामा येथे परवानाप्राप्त देशी दारूचे दुकान भर वस्तीत आहे. या दारू दुकानाच्या २० मीटरच्या आत आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी, मंदिर आहे. दारू दुकानासमोर दारूड्यांचा नेहमीच तांडव सुरू असतो. त्यामुळे परिसरातील वातावरण दूषीत झाले आहे. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत परवानाप्राप्त देशी दारू दुकान हटविण्याची मागणी महिलांनी केली.
मागील अनेक महिन्यांपासून हे दारू दुकान बंदच होते. परंतु आता हे दुकान सुरू करण्यासाठी दुकानदाराचा प्रयत्न आहे. तर सर्व गावकरी महिला-पुरूष येऊन हे दारू दुकान बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. त्यानंतरही दुकान बंद न झाल्यामुळे महिलांनी लोकशाहीच्या पध्दतीने उपोषण सुरू केले. दारू दुकानासमोर असलेल्या मंडपात महिलांची भरगच्छ गर्दी पाहून ठाणेदार दसुरकर यांनी पोलीस बंदेबस्त लावला. हा बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था ठेवण्याच्या दृष्टीने योग्य होता. परंतु या प्रकरणात ठाणेदार दसुरकर यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी उपोषण करणाºया महिलांनाच धारेवर धरले. त्यांना विविध प्रकारचे उदाहरण देत त्यांच्या गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप आहे. यावेळी उपोषण मंडपातील काही महिलांनी त्यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लीप करणे सुरू केले. त्यांच्या व्हिडिओ क्लीपकडे ठाणेदाराचे लक्ष जाताच त्यांनी आवरते घेत आक्रोश व्यक्त करीत त्या सर्वांचे मोबाईल हिसकावून घेतले. सर्वाच्या मोबाईल मधील व्हिडिओ डिलिट करून त्यांना मोबाईल परत केला. ठाणेदारच्या या कृत्यामुळे महिलांमध्ये असंतोष आहे.

मंडपातील महिलेला मारहाण
या उपोषण मंडपात असलेल्या गीता ब्राम्हणकर या महिलेला गावातील दारूड्या तरूण राजू उर्फ मल्ल्या बुधराम बावणकर (२४) याने शिविगाळ करीत मारहाण केली. या संदर्भात महिलेच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्एा दाखल केला आहे. हा प्रकार पोलिसांच्या समोरच घडला. तरी पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली नाही असा महिलांचा आरोप आरोप आहे.
दारू पिणाºयांना पोलिसांचे संरक्षण
रिसामा येथील देशी दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन महिला उपोषणावर बसल्या. दारू पिण्यासाठी जाणाºयांना महिलांनी अडवू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. दारू पिणाºयांना अडवू नका अशी धमकी ठाणेदाराने महिलांना दिली. ठाणेदाराने स्वत: दारू दुकानाच्या गेटवर उभे राहून दारू पिणाºयांना आत जाण्यास सांगितले. महिला अडविण्यासाठी तयार होत्या त्यांना तंबी देण्याचे काम सुरूच होते. ठाणेदाराने दारू पिणाºयांना दारू पिण्याचा परवाना आहे का हे न विचारताच दारू पिण्यास जाण्यासाठी दारूड्यांचे संरक्षण केल्याचा आरोप महिलांचा आहे.

पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी
पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी मागणी लक्ष्मी डोये, शोभा येटरे, दुर्र्गा येटरे, अंजना येटरे, सतिा ब्राम्हणकर, संगीात ब्राम्हणकर, चंद्रभागा पाथोडे, निर्मला गायधने, अलका पाथोडे, विजया ब्राम्हणकर, सुनिता ब्राम्हणकर, कौतुका ब्राम्हणकर, सुमत्रा ब्राम्हणकर, प्रतिमा भालाधरे, वंदना डोंगरे, अल्का तरोणे, मिना खटले, अनती पागोटे, प्रेमलता पागोटे, पारबता डोमळे, गीता भांडारकर, प्रमिला शिवणकर,सरस्वता भांडारकर, सुशीला बहेकार, शोभा मेंढे, गिता ब्राम्हणकर, फुलन चुटे, लिला मेंढे, प्रभू उके, हेमलता पागोटे, मालन तुमसरे, भागरता पागोटे, रता पागोटे, इंदू ब्राम्हणकर, लता पाठक, सरस्वता हेमणे, निर्मला बोहरे, जयवंता वाढई, मिठू येटरे, अरुणा बहेकार, सविता बोहरे, ललीता श्यामकुंवर, लक्ष्मी डोंगरे व इतर गावकºयांनी केली आहे.

महिला उपोषणावर बसल्या तर त्यांनी शांततेने बसावे. पोलिसांनी त्यांना कायदा व सुव्यवथा समाजावून सांगू नये का? अनेक उदारहणे घेऊन त्यांना समजावणे योग्यच आहे. महिलांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, या दारू दुकानासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांना आहे. तसा अहवाल आम्ही पाठविला आहे.
-शशीकांत दसुरकर
ठाणेदार आमगाव.

Web Title: And ... Thane's threat of video threatens to delete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.