अंगणवाडी सेविका मोबाईल करणार परत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:54+5:302021-08-22T04:31:54+5:30
इसापूर : देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने अंगणवाडी सेविका ते मोबाईल परत करणार आहेत. यासाठी अंगणवाडी ...
इसापूर : देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने अंगणवाडी सेविका ते मोबाईल परत करणार आहेत. यासाठी अंगणवाडी सेविका सोमवारी (दि. २३) दुपारी १२ वाजता दुर्गा चौक येथून बाल विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने दिलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे आहेत. मोबाईलमध्ये माहिती जास्तीची भरावी लागत असल्याने मोबाईल हँग होतो. त्यामुळे ऑनलाईन कामे करताना त्रास होतो व कामेसुद्धा वेळेवर होत नाही. वेळेवर माहिती दिली नाही तर सेविकांचे मानधन कपात करण्यात येते. तसेच मोबाईल खराब झाल्यास सेविकांना स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून दुरुस्ती करावी लागते. यावर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने मोबाईल परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संघटनेच्यावतीने बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि. १७) पत्र दिले असून सोमवारी (दि. २३) मोर्चा काढला जाणार असल्याचे कळविले आहे.