अंगणवाडी सेविकांचे मोबाइल वापस आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:36+5:302021-08-26T04:31:36+5:30
देवरी : तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता एकात्मिक बाल विकास कार्यालयावर मोर्चा काढून मोबाइल वापस आंदोलन ...
देवरी : तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता एकात्मिक बाल विकास कार्यालयावर मोर्चा काढून मोबाइल वापस आंदोलन केले. शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे असून, याचा यावेळी त्यांनी निषेध नोंदविला.
अंगणवाड्यांची व दाखल बालकांची योग्य माहिती शासनाला पुरविण्यात यावी यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले होते. या मोबाइलमध्ये चालणारे सॉफ्टवेअर हे इंग्रजी भाषेत असल्याने बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ते भरणे देखील जमत नाही. मोबाइलची रॅम कमी असल्याने हा मोबाइल व्यवस्थित चालत नसून माहिती भरायला अडचण होते. माहिती भरण्यास उशीर झाल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार कपात केले जात आहेत. आधीच अल्प पगारात काम करणे परवडत नसल्याने त्यातच मोबाइल दुरुस्तीचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. शासनाने मराठी किंवा हिंदी भाषेत चालणारे सॉफ्टवेअर टाकून आणि रॅम वाढवून नवीन मोबाइल द्यावे देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच त्यांच्याकडील मोबाइल एकात्मिक बाल विकास कार्यलयाला परत केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कुमुद एनप्रेडिवार, सुनीता डोये, अल्का बिसेन, आशा तोरणकर, सरिता रहिले, सुनंदा रामटेके, रेखा नाईक, चंद्रकला औरासे, हस्तकला उइके, मीना राठोड यांची उपस्थिती होती.