विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाशी जुळवून ठेवणे हेच शिक्षकाचे खरे कर्म-प्राचार्य अनिल मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:27 AM2021-04-18T04:27:51+5:302021-04-18T04:27:51+5:30
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका ...
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते देवी सरस्वती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. सांस्कृतिक समिती सदस्य प्रा. इंद्रनील काशिवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती विशद केली. प्राचार्य मंत्री म्हणाले की, संपूर्ण देशात कोरोनाचा कठीण काळ निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, शिका, संघर्ष करा व संघटित व्हा या मंत्राचा स्वीकार करण्यासाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडणे व कोरोनाची वाढती साखळी तोडणे आवश्यक आहे. हीच खरी डॉ. आंबेडकरांना आदरांजली ठरेल. यावेळी वर्ग ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व कथाकथन स्पर्धा यांचे व्हिडिओ वर्गाच्या ग्रुपवर अपलोड करण्यासाठी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. इंद्रनील काशिवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.