५० टक्के अनुदानावर पशुसंवर्धनाच्या योजना

By admin | Published: June 26, 2016 01:45 AM2016-06-26T01:45:52+5:302016-06-26T01:45:52+5:30

शेतीपूरक जोडधंदा म्हणून पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसाय करुन आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी पशुसंवर्धन

Animal husbandry scheme for 50% subsidy | ५० टक्के अनुदानावर पशुसंवर्धनाच्या योजना

५० टक्के अनुदानावर पशुसंवर्धनाच्या योजना

Next

गोंदिया : शेतीपूरक जोडधंदा म्हणून पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसाय करुन आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर विविध योजना राबविण्यात येत आहे.
राज्यस्तरीय योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण योजना सन २०१६-१७ या वर्षात राबविण्यात येणार आहेत. सहा, चार किंवा दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे गट वाटप करण्यात येणार आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहे. ठाणबंध पध्दतीने शेळीपालन करणे व एक हजार मांसल पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह बांधण्यासाठी राज्यस्तरीय योजना ५० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात १२ जुलैपर्यंत स्वीकारण्यात येतील.
ज्या लाभार्थ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी मागील तीन वर्षामध्ये वरील योजनेचा लाभ घेतला असेल किंवा जिल्हा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांनी नव्याने अर्ज सादर करु नये. अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी पंचायत समती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त गोंदिया यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Animal husbandry scheme for 50% subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.