अंनिसने उतरविले गौतमनगरचे भूत

By admin | Published: July 5, 2015 01:57 AM2015-07-05T01:57:58+5:302015-07-05T01:57:58+5:30

एक जिन्न मोकाट सुटला असून तोच बकऱ्या व कोंबड्यांना मारत असल्याची अफवा शहरातील गौतमनगर परिसरात सध्या चांगलीच पसरली आहे.

Anisan Gautamnagar's ghosts descended | अंनिसने उतरविले गौतमनगरचे भूत

अंनिसने उतरविले गौतमनगरचे भूत

Next

अफवेने दहशत : बकऱ्या व कोंबड्या मारल्या, समाजकंटकाचे कृत्य
गोंदिया : एक जिन्न मोकाट सुटला असून तोच बकऱ्या व कोंबड्यांना मारत असल्याची अफवा शहरातील गौतमनगर परिसरात सध्या चांगलीच पसरली आहे. या प्रकारामुळे मात्र परिसरातील नागरिकांना घराबाहेर निघणे सोडले आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकाराची शक्यता फेटाळून लावली असून नागरिकांची समजूत घातली आहे.
शहरातील गौतम नगर परिसरात मागील काही दिवसांपासून बकऱ्या व कोंबड्यांची गळा दाबून हत्या केली जात असल्याचे सत्र सुरू आहे. यातच काही दिवसांपूर्वी परिसरातील प्रेम कुल्फीवाल यांच्या पाच बकऱ्या व आठ कोंबड्या मारण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांना गळा दाबून मारण्यात आल्याने जिन्न सुटला असून तोच त्यांचे रक्त प्राशन करून मारत असल्याची अफवा परिसरात पसरली आहे.
जिन्नच्या भितीमुळे गौतमनगरवासीयांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. एवढेत नव्हे तर मोठ्यांनीही अंधार पडल्यावर घराबाहेर निघणे बंद केले आहे. तर अनेकांची प्रकृती दहशतीमुळे खराब होत असल्याचेही प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे काहींनी तर रात्री दोन -तीन वाजताच्या सुमारास शैतानाने घराचा दरवाजा ठोकल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)

अनिसच्या कार्यकर्त्यांनी दिली भेट
जिन्नची अफवा पसरवून गौतमनगरात सुरू असलेल्या या प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे, सदस्य अंकेश शहारे, प्रभाकर वऱ्हाडे , संजय यादव, पप्पू वासनीक यांनी परिसरात जाऊन नागरिकांची भेट घेतली. घडलेल्या प्रकाराची पाहणी करून कार्यकर्त्यांनी जिन्नचा प्रकार फेटाळून लावला. तर हे कृत्य एखाद्या समाजकंटकाकडून केले जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना निर्भयपणे राहण्यास सांगीतले असून भितीदायक प्रकार घडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Anisan Gautamnagar's ghosts descended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.