अण्णाभाऊ साठे म्हणजे शोषित-पीडितांचा बुलंद आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:41+5:302021-08-02T04:10:41+5:30
अर्जुनी-मोरगाव : स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी सनातनी लोकांचा विरोध करत, सामान्य माणसाला खरे स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणत ताकदीने आवाज ...
अर्जुनी-मोरगाव : स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी सनातनी लोकांचा विरोध करत, सामान्य माणसाला खरे स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणत ताकदीने आवाज लावणारे अण्णाभाऊ साठे हे खरोखर सामान्य नागरिक, शोषित आणि कष्टकरी वर्गाचे खरे नेतेही होते. म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे शोषित व पीडितांचा डरकाळी फोडणारा खरा बुलंद आवाज आहेत, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व कवी मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.
परिवर्तनशील साहित्य महामंडळाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. गुरुदेव रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून के.ए. रंगारी, टी. एस. बन्सोड, एस.टी. बोरकर आदी उपस्थित होते. संचालन सी.टी. तिरपुडे यांनी केले, तर आभार एन.सी. रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.