जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 09:21 PM2019-07-23T21:21:52+5:302019-07-23T21:22:49+5:30

५३६ मीमी पाऊस अपेक्षित असताना अद्याप फक्त २५२ मीमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. रोवणी झाली नसून पºहे वाळू लागले आहेत. अशात गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली आहे.

Announce the district drought affected | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँगे्रस पक्षाची मागणी : शासनाला पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ५३६ मीमी पाऊस अपेक्षित असताना अद्याप फक्त २५२ मीमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. रोवणी झाली नसून पºहे वाळू लागले आहेत. अशात गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली आहे. यासाठी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यामार्फत शासनाला मंगळवारी (दि.२३) निवेदन पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लावगड केली जाते. जिल्ह्यातील हे एकूण क्षेत्र आजही सिंचनाखाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना देवाच्या कृपेवरच अवलंबून रहावे लागते. यंदाही तीच स्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५३६ मीमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र फक्त २५२ मीमी पाऊस बरसला आहे. यामुळे शेतकरी वेळेवर नर्सरी टाकू शकले नाही. आता नर्सरी टाकली टाकली तर पाऊस नसल्याने रोवणी अडली आहे. शिवाय पºहा वाळत चालले आहे. एकंदर पावसाच्या खेळीमुळे शेतकरी संकटात अडकला आहे.
करिता ही सर्व स्थिती लक्षात घेत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली असून जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांच्या मार्फत शासनाला मंगळवारी (दि.२३) निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, प्रदेश सदस्य मनोहर चंद्रिकापुरे, राजलक्ष्मी तुरकर, रमेश ताराम, देवेंद्रनाथ चौबे, किशोर तरोणे, मनोज डोंगरे, प्रभाकर दोनोडे, बालकृष्ण पटले, अशोक सहारे, जितेश टेंभरे, केतन तुरकर, प्रेम रहांगडाले, डॉ. अविनाश काशिवार, कमल बहेकार, लोकपाल गहाणे, तुकाराम बोहरे, दुर्गा तिराले, कैलाश पटले, सुखराम फुंडे, वीना बिसेन, जियालाल पंधरे, भास्कर आत्राम, राजेश भक्तवर्ती, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, सी.के.बिसेन, विनोद बोरकर, उमेद सोनवाने, अंतरिक्ष बहेकार, रौनक ठाकुर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातून मांडल्या या मागण्या
शेतकºयांचे कर्ज सरसकट माफ करून हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई द्या, शेतकरी व शेतमजूर अडचणीत असून त्यांना सर्व प्रकारच्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करवून द्या, संपूर्ण जिल्ह्यात धानाची नर्सरी व शेतीशी संबंधीत विभागाच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे, अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून त्यासंबंधीत उपाययोजना करण्यात याव्या, ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला नाही त्यांनी तातडीने विशेष बाब म्हणून शासनाच्यावतीने पीकविमा काढावा, ज्या शेतकऱ्यांच्या नर्सरी वाळत आहेत त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना मदत करणे व त्यांचाही विशेष बाब म्हणून पीकविमा काढावा, मागेल त्याला काम या दृष्टीने शेतकरी शेतमजूरांना त्यांच्याच गावात काम उपलब्ध करवून द्या, पुढील हंगामासाठी मोफत बियाणे व खते उपलब्ध करवून द्यावे, भविष्यात निर्माण होणारे संकट लक्षात घेता शेतकऱ्यांकडली जनावरांसाठी छावण्या सुरू करून मोफत चारा उपलब्ध करावा, अल्प व मध्यम मुदती चालू थकीत कर्ज आहे ते माफ करावे, ज्वारी सारख्या कमी पावसाच्या पिकांच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मदत करणे व शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा.

Web Title: Announce the district drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.